यवतमाळ: भरगच्च अशी गर्दी दसरा मेळाव्यासाठी मुंबई बीकेसी ( Mumbai BKC ground ) येथे जमवीण्यासाठी शिंदे गटाकडून प्रत्येक आमदार खासदार मंत्र्यांना टारगेट देण्यात आले होते. त्यानुसार महाराष्ट्राच्या संपूर्ण कानाकोपऱ्यातून ग्रामीण भागातून ट्रॅव्हल्स व इतर चार चाकी वाहन फार मोठ्या प्रमाणात गावागावात पाठविण्यात आले. असेच एक यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस विधानसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या मतदारसंघातून अनेक ट्रॅव्हल्स गाड्या मुंबई बीकेसी येथे नेण्यात आले. मुंबई बांद्रा बीकेसी येथे एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा सुरू होता. या मेळाव्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक आले होते. मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शन एकनाथ शिंदे यांचे होते. शिवसैनिकांनी बीकेसी मैदानात गर्दी केली होती. ( Death in dussehra Melava )
Death in dussehra Melava : दसरा मेळाव्यातच शिवसैनिकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू - Dussehra Melava in Mumbai
दसरा मेळाव्यासाठी ( Dasara Melava 2022 ) हरसुल या गावातून गेलेल्या शिवसैनिकाचा मुंबईमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू ( Death in dussehra Melava ) झाला. निधन झाल्यामुळे हरसुल गावासह तालुक्यामध्ये शोककळा पसरली आहे.
मुंबईत दसरा मेळावा दरम्यान मृत्यू :दिग्रस तालुक्यातील हरसुल या गावातून दोन ट्रॅव्हल्स मुंबईकडे रवाना झाल्या होत्या. त्या ट्रॅव्हल्स सुखरूप पणे मुंबई बीकेसी मैदानात पोचल्या, परंतु अफाट गर्दीमुळे व वेदना असह्य झाल्याने हरसुल गावातील श्रीकृष्ण भाऊराव मांजरे वय वर्ष 55 शिवसैनिक या व्यक्तीला मुंबई येथे दसरा मेळाव्यासाठी गेले असता हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे जागीच निधन ( Died on the spot due to heart attack ) झाल्यामुळे हरसुल गावासह तालुक्यामध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर उभा झाला आहे. मृतक श्रीकृष्ण भाऊराव मांजरे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, एक मुलगी व नातवंड असा मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या जाण्याने संपूर्ण दिग्रस तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.