यवतमाळ -केंद्र शासनाने छुप्या पद्धतीने पारित केलेले तीन कृषी कायद्याला देशभरातून शेतकऱ्यांचा विरोध होत आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि मध्यप्रदेश येथील शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचे पडसाद यवतमाळ उमटले आहे. शुक्रवारी (दि. 4 डिसेंबर) शेतकरी पुत्र संघर्ष समितीच्या वतीने दिल्ली येथील आंदोलनाच्या समर्थनार्थ बिरसा मुंडा चौकातून ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. तर बसस्थानक चौकात या रॅलीचा समारोप होऊन ठिय्या आंदोलन करण्यात आले. आता ट्रॅक्टर रॅली काढली हे कायदे रद्द न केल्यास हातात दंडुके ही घेण्यास मागेपुढे पाहणार नाही, अशी भूमिका या समितीने घेतलेली आहे. त्यामुळे येत्या काळात यवतमाळ जिल्हामध्ये या कायद्याच्या विरोधात एक जनआंदोलनात उभारण्यात येणार आहे.
शेतकरी पुत्र उतरले आंदोलनात
शेतकरी पुत्र संघर्ष समितीमध्ये विविध पक्षाचे वा राजकीय संघटनांचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले. तर शेतकरी, शेतकरी पुत्र संघर्ष समितीने स्वतः आंदोलन उभारले आहेत. मागील चार दिवसांमध्ये दिल्लीतील शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला विविध राजकीय सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळत आहे.