यवतमाळ जिल्हयात 301 कोरोनामुक्त.. 73 नवे पॉझिटिव्ह तर चार जणांचा मृत्यू - यवतमाळ कोरोना अपडेट
यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असून जिल्ह्यात 24 तासात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 301 असून 73 जण पॉझिटिव्ह आले आहेत. दिवसभरात चार जणांचा मृत्यू झाला.
यवतमाळ -जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असून जिल्ह्यात 24 तासात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 301 असून 73 जण पॉझिटिव्ह आले आहेत. दिवसभरात चार जणांचा मृत्यू झाला. यातील तीन मृत्यू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर एक मृत्यू खासगी रुग्णालयातील आहे.
1,252 रुग्ण ॲक्टीव्ह -
सद्यस्थितीत जिल्ह्यात 1252 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 579 तर गृह विलगीकरणात 673 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 71997 झाली आहे. 24 तासात 301 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 68977 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1768 मृत्यूची नोंद आहे. जिल्हयात आतापर्यत 6 लक्ष 26 हजार 570 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 5 लक्ष 52 हजार 933 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 11.49 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 1.70 आहे तर मृत्यूदर 2.46 आहे.
रुग्णालयात 1921 बेड उपलब्ध -
जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2279 आहे. यापैकी 358 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1921 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 106 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 471 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 106 रुग्णांसाठी उपयोगात तर 420 बेड शिल्लक आणि 34 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1176 बेडपैकी 146 उपयोगात तर 1030 बेड शिल्लक आहेत.