महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळ जिल्ह्यात 75 नवे कोरोनाग्रस्त, एकाचा मृत्यू - यवतमाळ कोरोना बातमी

यवतमाळ जिल्ह्यात रविवारी 75 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून एका बाधिताचा मृत्यू झाला आहे.

कोविड सेंटर
कोविड सेंटर

By

Published : Feb 21, 2021, 10:27 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यात रविवारी (दि. 21 फेब्रुवारी) 75 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. 53 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

यवतमाळ जिल्ह्यात 75 नवे कोरोनाग्रस्त, एकाचा मृत्यू

जिल्ह्यात 950 सक्रिय रुग्ण

सद्यस्थितीत जिल्ह्यात 950 सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 16 हजार 45 झाली आहे. मागील 24 तासांत 53 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 14 हजार 648 वर पोहोचली आहे. तर जिल्ह्यात एकूण 447 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

1 लाख 52 हजार 512 जणांची तपासणी

सुरुवातीपासून आतापर्यंत 1 लाख 52 हजार 512 जणांची तपासणी झाली असून त्यापैकी 1 लाख 51 हजार 831 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. तर 681 अप्राप्त आहेत. तसेच 1 लाख 35 हजार 786 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आले आहे.

हेही वाचा -हृदयविकाराने मृत्यू झालेल्या प्रशिक्षणार्थी जवानावर अंत्यसंस्कार

ABOUT THE AUTHOR

...view details