महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वणी शहरातील जुगार अड्ड्यावर छापा; दहा जुगारींसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त - Gambling in yavatmal

वणी शहरातील शास्त्री नगर येथे राहणाऱ्या आरीफ रहमान खलील रहमान याने स्वत:च्या घरात जुगार अड्डा सुरू केला होता. त्या जुगार अड्ड्यावर परजिल्ह्यातील जुगारी खेळण्याकरीता येत होते.

Yavatmal sdpo
जुगार अड्ड्यावर एसडीपीओ पथकाची धाड; दहा जुगारींसह साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त

By

Published : Jul 10, 2020, 8:20 AM IST

यवतमाळ - वणी येथे राजरोसपणे घरात सुरू असलेल्या जुगारावर उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाने धाड टाकून 10 जुगारींना अटक केली. ही कारवाई वणी शहरातील शास्त्री नगर येथे करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी 3 लाख 31 हजार 700 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आरिफ रहमान खलील रहमान (वय-42 रा. शास्त्री नगर), वणी शरफोद्दीन शहा नन्नाशहा (वय-52, रा. रामपुरवार्ड राजुरा जि. चंद्रपूर), विनोद जिवतोडे (वय-37 रा. चिखलगाव वणी), नंदु खापणे (वय-27, कोलगाव ता. मारेगाव), अनिल मिश्रा (वय-32, रा. शास्त्री नगर, घुग्गुस जि. चंद्रपूर), हिरासिंग अकाली (52, रा. कोरा समुद्रपूर जि. वर्धा), जगदिश पाटील (37 रा. राजुर कॉलनी, वणी) प्रशांत कोठारी (49, रा. सावरकर चौक, वणी), जहीर रियाज शेख (32,रा. घोन्सारोड, मारेगाव) यांना अटक करण्यात आली आहे.

वणी शहरातील शास्त्री नगर येथे राहणाऱ्या आरीफ रहमान खलील रहमान याने स्वत:च्या घरात जुगार अड्डा सुरू केला होता. त्या जुगार अड्ड्यावर परजिल्ह्यातील जुगारी खेळण्याकरीता येत होते. याबाबतची गोपनीय माहिती वणी उपविभागीय पोलिस अधिकारी सुशिलकुमार नायक यांना मिळाली होती. त्यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने सापळा रचून त्या जुगारावार धाड टाकली. यात तीन लाख 31 हजार 700 रूपयाची रोख आणि जुगार साहित्य जप्त केले.

या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. ही कारवाई वणी उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील विजय वानखडे, इकबाल शेख, आशिष टेकाडे, रवि इसणकर, अशोक दरेकर यांनी पार पाडली.

ABOUT THE AUTHOR

...view details