यवतमाळ -जिल्ह्यातील लोहारा गावातील एका खासगी शाळेची इमारत कोसळल्याची घटना घडली. या घटनेत पाच विद्यार्थी जखमी झाले आहेत. लोहारा येथील स्व. रतिराम टेंभरे हायस्कूल असे या खासगी शाळेचे शाळेचे नाव आहे. ही घटना 9 फेब्रुवारीला घडली. यानंतर शाळेने हे प्रकरण दडपण्याच्या प्रयत्न केला. मात्र, जखमी विद्यार्थ्यांना खासगी रुग्णालयात दाखल केल्याने हे घटना समोर आली.
मोठी दुर्घटना टळली -
तुमसर तालुक्यतील लाहोरा या गावात स्व. रतिराम टेंभरे ही 5 ते 12 वी पर्यंतची शाळा आहे. घटनेच्या दिवशी शाळा नियमितपणे सुरु होती. विद्यार्थी अध्ययन करीत बसले असतांना अचानकपणे भिंत कोसळली. यात 5 विद्यार्थी जखमी झाले. शाळा प्रशासनाने शाळेतच डॉक्टर यांना बोलावून उपचार सुरू केले. यात मयुरी नेवारे वय 13 वर्ष, सोनाली शिवरकर वय 13 हे जखमी झाले आहेत. उमाशंकर सपाटे याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला तुमसर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर बाकी विद्यार्थी किरकोळ जखमी आहेत. हे सर्व विद्यार्थी आठवी वर्गात शिक्षण घेत आहेत.
घटना शाळा प्रशसनाच्या निष्काळजीमुळे घडली. तसेच जी भिंत कोसळली ती अनेक दिवसांपासून जीर्ण अवस्थेत आहेत. त्या भिंतीला भेगा पडल्याचे पालक, विद्यार्थी सांगतात. ही भिंत जर विद्यार्थ्यांच्या डोक्यावर पडली असती तर जीवित हानी झाली असती. मात्र, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे.
हेही वाचा -पूजा चव्हाणसाठी समाजाने रस्त्यावर उतरावे, प्रकरणात बड्या मंत्र्याचे नाव