महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...म्हणून यवतमाळमध्ये संस्थाचालकाने दिव्यांग मुलाच्या हातात दिला 'टीसी'

शासनाने दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध करून देत त्यांना शिक्षणाचा हक्क प्रदान केला आहे. त्यांची गैरसोय होणार नाही, त्यांना सोयीच्या शाळेत ज्ञानार्जनाचे धडे घेता यावे यासाठी विशेष सवलत पुरवण्यात येते.

...म्हणून यवतमाळमध्ये संस्थाचालकाने दिला दिव्यांग मुलाच्या हातात 'टीसी'

By

Published : Jun 5, 2019, 2:08 PM IST

यवतमाळ - मारेगाव येथील नामवंत इंग्रजी माध्यम शाळेच्या संस्थाचालकाला एका पालकाने आपल्या दुसऱ्या मुलाच्या टीसीची मागणी केली. मात्र, संस्थाचालकाने त्या पालकाच्या दिव्यांग मुलाची टीसी त्यांच्या हातात देवून हाकलुन लावल्याचा त्या पालकाने केला आहे. त्यामुळे शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा शिक्षणाधिकाऱयांकडे पालकानी दिले आहे. विद्यानिकेतन इंग्लीश मिडीअम असे त्या शाळेचे नाव आहे.


काय आहे प्रकरण -


मारेगाव शहरातील विद्यानिकेतन इंग्लीश मीडिअम स्कुलमध्ये येथील अनिल नामदेव बोंडे यांचे दोन मुले तेजस व नयन शिकत होते. चालु शैक्षणीक वर्षात तेजस हा आठव्या वर्गात गेल्याने त्याला पुढील शिक्षणासाठी सोयीच्या दृष्टिने इतरत्र पाठवण्याचे ठरवण्यात आले होते. तेजसच्या टीसीची रितसर मागणी करण्यात आली. मात्र, संस्थाचालकांचा राग अनावर होवून येथील संस्थाचालकाने चक्क दुसऱ्याही दिव्यांग असलेल्या नयनचा टीसी देवून पालकांना हाकलून लावल्याची तक्रार अनिल बोंडे यांनी जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकाऱयांकडे केली आहे. दिव्यांग विद्यार्थ्याची नियबाह्य टीसी हातात दिल्याप्रकरणी शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी केली आहे.


शासनाने दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध करून त्यांना शिक्षणाचा हक्क प्रदान केला आहे. त्यांची गैरसोय होणार नाही, त्यांना सोयीच्या शाळेत ज्ञानार्जनाचे धडे घेता यावे यासाठी विशेष सवलत पुरवण्यात येते. तसेच एखाद्या विद्यार्थ्याला पुढील शिक्षणासाठी शाळा बदलायची असल्यास संबंधित शाळेची मान्यता मिळवावी लागते. मात्र, येथील शाळेच्या अध्यक्षाने पुढील शाळेत प्रवेशासंबंधीचा दस्ताऐवज न मागता पहिल्या मुलाचा टीसी मागण्याच्या रागापोटी या दुसऱया दिव्यांग विद्यार्थ्याची टिसी दिल्याने दुसऱया शाळेत या दिव्यांग विद्यार्थ्याचा प्रवेश गैरसोयीचा झाला आहे. त्यामुळे त्याच्या पुढील शैक्षणिक सत्राचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली असून पुढील शैक्षणिक वर्षात शिक्षणाच्या हक्कापासून वंचित ठेवणाऱया या शाळेची मान्यता रद्द करावी अशी मागणी पीडित दिव्यांगच्या पालकाने केली आहे.


चौथ्या वर्गात शिकणाऱ्या नयन नावाच्या मुलाला शाळेच्या पटांगणात खेळत असताना शाळेच्या स्कूल बसने धडक देऊन तीन वर्षांपूर्वी अपघातग्रस्त केले होते. या अपघाताची तक्रार पोलिसात करू नये म्हणून पालकांना शाळेचे संस्थाचालक व प्राचार्य यांनी या विद्यार्थ्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत देऊ, असे आश्वासन दिले होते. या अपघातामध्ये नयनला 53 टक्के अपंगत्व आले आहे. मात्र, आता मोठ्या मुलाची टीसी देताना या आश्वासनाचा विसर प्राचार्य व संस्थाचालक यांना पडला आहे. केवळ मोठ्या मुलाची दुसरीकडे शिक्षणासाठी टीसी मागितल्याच्या रागापोटी या दिव्यांग मुलांची टीसी पालकांच्या हातात देण्यात आली. त्यामुळे आता या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details