यवतमाळ- राज्यसरकारने काही समाजांना आरक्षण देऊन 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडली असून ती 78 टक्क्यांवर पोहोचली आहे. त्यामुळे 78 टक्केतील खुला प्रवर्ग आता 22 टक्केवर पोहोचला आहे. तरीही या 22 टक्यामध्येसुद्धा आरक्षण असलेला समाज अर्ज करत आहे. त्यामुळे सरकारला जागे करण्यासाठी दत्त चौकात पालकमंत्री मदन येरावार यांच्या निवासस्थानाजवळ 'सेव्ह मेरिट सेव्ह नेशन' कृती समितीच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले.
गुणवंताचे रक्षण करा : 'सेव्ह मेरिट सेव्ह नेशन'चे यवतमाळमध्ये घंटानाद आंदोलन - क्रांती दिन
राज्यसरकारने काही समाजांना आरक्षण देऊन 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडली असून ती 78 टक्क्यांवर पोहोचली आहे. त्यामुळे सरकारला जागे करण्यासाठी दत्त चौकात पालकमंत्री मदन येरावार यांच्या निवासस्थानाजवळ 'सेव्ह मेरिट सेव्ह नेशन' कृती समितीच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले.
आंदोलकांना पालकमंत्री मदन येरावार यांच्या घराच्या अलीकडेच रोखण्यात आले. यावेळी पालकमंत्री मदन येरावार यांनी आंदोलकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यसरकारने मॅनेजमेंटच्या जागा कमी करून खुल्या प्रवर्गात जागा वाढविल्या असल्याचे सांगितले. तसेच आपली मागणी सरकारपर्यंत पोहचतो असे आंदोलकांना आश्वासन दिले.
सध्या राज्यात सर्व समाज आरक्षण मागत आहेत. नुकतेच सरकरने काही समाजाला आरक्षण जाहीर केले आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील गुणवंतांना डावलले जात आहे. म्हणून, सरकारने या मागणीबाबत लवकरच सकारात्मक विचार करावा, अन्यथा 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनी महामोर्चा काढण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.