महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Etv Bharat Special - कामठवाडा गावात लावले सीसीटीव्ही कॅमेरा; ग्रामस्थांकडून कौतुक - यवतमाळ जिल्हा

यवतमाळमधील कामाठवाडा या गावात महिलासरपंचांनी सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Installed in Yavatmal) बसवले आहे. यामुळे चोरी, छेडछाड या प्रकारच्या कामांना आळा बसला आहे. याबद्दल ग्रामस्थांकडून कौतुक केले जात आहे.

Etv Bharat Special
महिला सरपंच

By

Published : Dec 11, 2021, 3:37 PM IST

यवतमाळ : शहरी भागात दुकान आणि प्रतिष्ठानात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची पद्धत रूढ झाली आहे. चोरी, छेडछाड आणि इतर प्रकारच्या घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होत असल्याने (CCTV Installed in Yavatmal) नागरिक प्राधान्य देतात. परंतु, गावाच्या सुरक्षेसाठी दारव्हा तालुक्यातील कामाठवाडा या गावात ग्रामपंचायतच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. हा उपक्रम राबविणारी कामठवाडाही जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.

महिला सरपंचाची प्रतिक्रिया
जिच्या हाती पाळण्याची दोरी, तीच जगाचा उद्धार करी अशी म्हण प्रचलित आहे, परंतु, जिच्या हाती गावच्या सत्तेची दोरी तीच विकास करी, अशी म्हण प्रचलित करण्याची वेळ आली आहे. त्यादृष्टीने कामठवाडा या गावाने स्मार्टग्रामच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. छाया बाळकृष्ण डवरे या महिला सरपंच असून, त्यांनी गावविकासाचा ध्यास घेतला आहे. कामानिमित्त त्या मुंबईत गेल्या होत्या. परत गावी आल्या असता, गावातील चित्र बघून, त्या सैरभैर झाल्या. एक वर्ष भरापूर्वी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्या उभ्या राहिल्या. थेट मतदारांनी विश्वास दाखवत निवडून आणले.
ग्रामस्थांकडून कौतुक

महिला सरपंचांनी केली अनेक विकासकामे

गावकऱ्यांनी दाखविलेला विश्वास सार्थकी ठरवत, विरोध होत असताना नवनवीन उपक्रम राबविण्याला सुरुवात केली. गाव विकासासाठी 15 व्या वित्त आयोगातून निधी दिला जातो. याच निधीतून गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. त्यामुळे महिला आणि मुलींची होणारी छेडछाड थांबली, अपघात, वाद झाल्यास त्या घटना कॅमेऱ्यात कैद होऊ लागल्या. सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असल्याने अवैध धंदे कमी झाले. त्यामुळे एकप्रकारे पोलिस प्रशासनाला मदत झाली. गावात माहिती देण्यासाठी दवंडी देण्याची प्रथा बंद झाली. लाऊड स्पीकरद्वारे माहिती दिली जाते. हायमास्ट लाईट लावण्यात आल्याने गाव प्रकाशाने उजळून निघाले आहे. फॉगिंग मशीनद्वारे फवारणी केली जाते. बधिरांसाठी कर्णयंत्र, अपंगांना व्हील चेअरचे वाटप करण्यात आले. कामठवाडा गावाला स्मार्ट करण्यासाठी अनेक उपक्रम महिला सरपंच डवरे राबवत आहे. विशेष म्हणजे या कामात पुरुष वर्गांच्या हस्तक्षेपाला आळा बसला असून, महिलांची मदत घेतली जाते. गाव विकास होत असल्याचे बघून, महिला, युवक, युवतींकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

सीसीटीव्ही कॅमेरा

हेही वाचा -Golden Hands To Tirupati Balaji : तिरुपती बालाजीच्या चरणी '3 कोटी' किंमतीचे सोन्याचे हात अर्पण

ABOUT THE AUTHOR

...view details