यवतमाळ - हरीण, रोही, राडुक्कर आणि माकडांचा हैदोस वाढत चालला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक एका रात्रीतून हे वन्यप्राणी फस्त करत आहेत. आता शेतकऱ्यांनी यासाठी नवी युक्ती शोधलीय. मार्की येथील शेतकऱ्यांनी पिकाचे संरक्षण करण्यासाठी चक्क साडीचा पर्याय निवडला आहे.
पिकाच्या संरक्षणासाठी साडीचा पर्याय... मार्किच्या शेतकऱ्यांची नामी शक्कल
वन्यप्राण्यापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी वेगवेगळ्या युक्त्या लढवत असतात. शेतात बुजगावणे लावणे, डांबरगोळी, सोलर कुंपण, बॅटरी करंट, थिमेत टाकणे, संरक्षक तारा लावणे यासारखे पर्याय नेहमीच वापरण्यात येतात. मात्र त्याचा फायदा होत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
वन्यप्राण्यांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी वेगवेगळ्या युक्त्या लढवत असतात. शेतात बुजगावणे लावणे, डांबरगोळी, सोलर कुंपण, बॅटरी करंट, थिमेत टाकणे, संरक्षक तारा लावणे यासारखे पर्याय नेहमीच वापरण्यात येतात. मात्र, त्याचा फायदा होत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. यासोबतच शेतात कुत्र्यांचे भुंकणे, वाघाची डरकाळी, माणसाचे ओरडणे असे रेकॉर्डिंगही लावले जाते. याचा काहीच उपयोग होत नसल्याने शेतकऱ्यांनी आता साडीची युक्ती शोधली आहे.
रानडुकरांच्या संख्येत वाढ झाल्याने ते सर्वात जास्त पिकाची नासाडी करत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. लगतच्या तेलंगणा राज्यात वन्यप्राण्यांपासून पिकांचा बचाव करण्यासाठी शेतीच्या कुंपणाला साडी लावण्यात येत असल्याचे निर्दशनास आले. यातून फायदा झाल्याचे थेतील शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे झरी तालुक्यात साडीचा वापर सुरू झाला. पिकाच्या संरक्षणासाठी ही नामी शक्कल असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यासाठी त्यांनी अल्पदरात साड्या आणल्या असून शेताच्या कुंपणाला लावल्या आहेत.