महाराष्ट्र

maharashtra

कोरोना रुग्णांसाठी संजय राठोड यांचा पुढाकार, 100 ऑक्सिजन कंसंट्रेटर दिले

By

Published : Apr 29, 2021, 8:54 PM IST

यवतमाळ जिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी माजी वनमंत्री तथा आमदार संजय राठोड यांच्या पुढाकाराने 100 ऑक्सिजन कंसंट्रेटर देण्यात आले. जे कोविड रुग्ण घरगुती उपचार घेत आहेत व ज्यांना अचानक श्वास घ्यायला त्रास होत आहे. त्याच्यासाठी हे कंसंट्रेटर फायद्याचे ठरणार आहे. आवश्यकतेनुसार आणखी कंसंट्रेटर उपलब्ध करून दिले जाणार आहेत. याचा दारव्हा, दिग्रस व नेर येथील रूग्णांना फायदा होणार आहे.

Yavatmal
यवतमाळ

यवतमाळ - जिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी माजी वनमंत्री तथा आमदार संजय राठोड यांच्या पुढाकाराने 100 ऑक्सिजन कंसंट्रेटर देण्यात आले. जे कोविड रुग्ण घरगुती उपचार घेत आहेत व ज्यांना अचानक श्वास घ्यायला त्रास होत आहे. तसेच ज्या रुग्णांची ऑक्सिजन पातळी 90 च्या खाली आहे, अशा रुग्णांना रुग्णालयात बेड उपलब्ध होईपर्यंत हे ऑक्सिजन कंसंट्रेटर मोठ्या फायद्याचे ठरणार आहेत.

स्वखर्चातून ऑक्सिजन कंसंट्रेटर दारव्हा, दिग्रस, नेरसाठी उपलब्ध

कोविड रुग्णांची ऑक्सिजन पातळी अचानक खाली जाऊन तो रुग्ण गंभीर होत आहे. अशा रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन उपलब्ध न झाल्यास त्या रुग्णाच्या शरीरातील कार्यप्रणालीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. सध्या यवतमाळ जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढल्याने रुग्णालयात देखील ऑक्सिजन बेड लवकर उपलब्ध होत नाही. त्यामुळे रुग्णाची स्थिती खालावते व अनेक रुग्ण उशिरा वैद्यकीय मदत व ऑक्सिजन मिळाल्याने दगावत आहेत. नेमकी हिच बाब दिग्रस विधानसभेचे आमदार व माजी मंत्री संजय राठोड यांच्या लक्षात आली. त्यामुळे अशा रुग्णांसाठी त्यांनी स्वखर्चातून ऑक्सिजन कंसंट्रेटर दारव्हा, दिग्रस व नेर येथे उपलब्ध करून दिले आहेत.

आवश्यकतेनुसार आणखी कंसंट्रेटर देणार

कोविड रुग्णांसाठी वैद्यकीय मदत उपलब्ध होईपर्यंत ऑक्सिजन कंसंट्रेटर फायद्याचे ठरत आहे. त्यामुळे अनेक रुग्ण गंभीर होण्यापासून वाचणार आहेत. ऑक्सिजन कंसंट्रेटर हे नवीन उपकरण आहे. त्याची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. पण दिग्रस विधानसभेत व यवतमाळ जिल्ह्यात आवश्यकतेनुसार हे उपकरण आपण आणखी उपलब्ध करून देणार असल्याचे आमदार संजय राठोड यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details