यवतमाळ : कृषीक्षेत्रात मिळवलेल्या पदव्या आणि संशोधनाचा उपयोग शेतकऱ्यांच्या हितासाठी व्हावा; म्हणून नोकरीच्या फंदात पडण्याऐवजी स्वत:ची बायोटेक लॅब निर्माण करून, यवतमाळच्या (Nari Shakti) संगीता सव्वालाखे (Sangeeta Savvalakhe) यांनी जैविक उत्पादनाच्या (organic production) निर्मिती क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत (reached an international level in the field) मजल मारली आहे.
यवतमाळच्या संगीता सव्वालाखे यांनी पंजाबराव कृषी विद्यापीठात कीटकशास्त्र विषयात एम.एस्सी. केली. संगीता यांनी अथक परिश्रमाने स्वत:ची बायोटेक लॅब स्थापन करून कमी खर्चात जैविक खते, जैविक कीटकनाशके व औषधे तयार करून कृषीक्षेत्रात एक प्रकारे क्रांतीच केली आहे. गरीब शेतकऱ्यांना, अल्प किमतीत परिणामकारक जैविक खते व कीटकनाशके देऊन, त्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी कार्य केले. राज्यात व परप्रांतात यावर त्या व्याख्याने देतात. घरच्या घरी खते कशी तयार करावीत, कोणत्या काळात कोणती पिके घ्यायची, अशी महत्वपूर्ण माहीती त्या शेतकऱ्यांना देतात. हजारो शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष जाऊन मार्गदर्शन करायचे व जैविक उत्पादन गुणवत्तेच्या बाबत तडजोड स्वीकारायची नाही, हे ठरवून या क्षेत्रात संगीता सव्वालाखे कार्य करीत आहे. संगीता यांना आयसीडब्ल्यूई अर्थात, 'आंतरराष्ट्रीय महिला उद्योजक काँग्रेसचे व लंडनच्या ओव्हरसिज डेव्हलपमेंटचे' सदस्त्व मिळाले आहे.