महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळ जिल्ह्यातील मृत आठ मारांचे नमुने पॉझिटिव्ह - Yavatmal latest news

आर्णी तालुक्यातील खंडाळा येथील मृत आठ मोरांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर उर्वरित लिंगटी येथील पोल्ट्री फार्म व इतर पक्षांचे नमुने अद्याप यायचे असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली.

Yavatmal
Yavatmal

By

Published : Jan 16, 2021, 7:28 PM IST

Updated : Jan 16, 2021, 7:41 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाला असून, आर्णी तालुक्यातील खंडाळा येथील मृत आठ मोरांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर उर्वरित लिंगटी येथील पोल्ट्री फार्म व इतर पक्षांचे नमुने अद्याप यायचे असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली.

खंडाळा गाव अलर्ट झोन घोषित

आर्णी तालुक्यातील खंडाळा येथे 8 मोरांचा मृत्यू झाला होता. ते नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवले होते. तेच नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे खंडाळा गाव अलर्ट झोन घोषित करण्यात आले आहे. जिल्ह्यात राळेगाव तालुक्यातील खैरी गावातसुद्धा 150 कोंबड्याच्या संशयास्पद मृत्यू झाला आहे. या ठिकाणी पशु वैद्यकीय अधिकारी रवाना झाले आहेत. पांढरकवडा तालुक्यातील लिंगटी येथे 494 कुकुट पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाला अलर्ट मोडवर काम करावे लागणार आहे. लोकांनी घाबरून न जाता उकडून मांस खावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केले.

Last Updated : Jan 16, 2021, 7:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details