यवतमाळ - महाराष्ट्र शासनाने 28 जूनपासून सलून दुकाने सुरू परवानगी दिली. पण, दाढी करु नका अशी ताकीद दिली. हा निर्णय सलून असोसिएशनला मान्य नाही. त्यामुळे जिल्ह्यातील दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय सलून असोसिएशनने घेतला आहे.
फक्त केस कापण्याच्या अटीवर 28 जूनला राज्यातील सर्व केशकर्तनालय सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील पाच टक्के सलून कारागिरांनी समाधान व्यक्त केले तर 95 टक्के सलून कारागीर नाराज झाले. केवळ केस कापल्याने चार महिन्याची भरपाई भरून निघेल काय, असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
कटींग करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह होणार नाही. शासनाने घेतलेला निर्णय एकदम चुकीचा आहे. सलून चालकांनी जगावे की मरावे आधीच महाराष्ट्रात पाच सलून बांधवांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केलेल्या आहेत. अजून पून्हा आत्महत्या झाल्यास याला महाराष्ट्र सरकार जबाबदार राहील, असा इशारा देण्यात आला आहे.