यवतमाळ -आपण बर्याच वेळी ऐकतो आरोग्याच्या सोयी-सुविधांअभावी नवजात बालके दगावतात. कधीकधी आरोग्य संस्थेत पोहोचण्यापूर्वी वाटेतच मातेची प्रसुती होते. अशा अनेक दुर्दैवी घटना घडत असतात. परंतु सोमवारी एक समाधानकारक घटना घडली. लोही, ता. दारव्हा येथील गरोदर माता जया रजनीश इंगोले (वय 25) Jaya Rajnish Ingole कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच प्रसव कळा सुरू झाल्याने ग्रामीण रुग्णालय लोही Rural Hospital Lohi येथे गेली. Malkhed sub-centre ती जोखमीची माता असल्याने तिला दुपारी 4 वाजता 108 रुग्णवाहिकेने यवतमाळ जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते.
Safe Childbirth At Malkhed Sub-Centre : यवतमाळमध्ये रुग्णवाहिकेच्या चालकासह डॉक्टरांच्या तत्पुरतेमुळे वाचले मातेसह बाळाचे प्राण - Safe delivery of mother at Malkhed sub center
लोही, ता. दारव्हा येथील गरोदर माता जया रजनीश इंगोले (वय 25) कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच प्रसव कळा सुरू झाल्याने ग्रामीण रुग्णालय लोही Rural Hospital Lohi येथे गेली. Malkhed sub-centre ती जोखमीची माता असल्याने तिला दुपारी 4 वाजता 108 रुग्णवाहिकेने यवतमाळ जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते.
मातेला वाहनातच प्रसव वेदना -नेर मार्गे यवतमाळला येत असताना वाटेतच Malkhed sub-centre मालखेड उपकेंद्राजवळ त्या मातेला वाहनातच प्रसव वेदना होऊन बाळ बाहेर येत होते. ते वाहन थांबवून वाहनचालक संदीप शेंडे यांनी उपकेंद्रात उपस्थित आरोग्यसेविका जया वेळूकार, कविता राऊत, आशासेविका जयश्री पिलावन, जयश्री ठाकरे, मदतनीस आशा बोबडे यांना माहिती दिली. त्यांनी तत्काळ संबंधित बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल भुसखंडे, डॉ. जय आडे यांना माहिती दिली. त्यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र दुर्गे यांना माहिती देऊन सर्वांशी समन्वय साधून उपकेंद्रात सुखरूप प्रसुती पार पाडली. मातेने 1 हजार 700 ग्रॅम वजनाच्या बाळाला जन्म दिला. या घटनेची तत्काळ दखल घेऊन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रल्हाद चव्हाण, अतिरित जिल्हा आरोग्ग्याधिकारी डॉ गाढवे, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. ठोंबरे यानी कर्मचार्यांचे अभिनंदन केले आहे.