यवतमाळ - रेतीमाफियांनी माहिती अधिकार कार्यकर्त्याचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे तर विवस्त्र करत मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले. या गंभीर गुन्ह्यातील सूत्रधार अजूनही पसार आहे. पोलिसांनी त्याच्या अटकेचे प्रयत्नच केले नाही. पैशाच्या जोरावर मस्तवाल रेतीमाफिया प्रशासकीय यंत्रणेला पायदळी तुडवत आहे, असा आरोप पीडितांनी केला आहे. या मुख्य आरोपींना अटक व्हावी यासाठी पीडित चंदन हातागडे याने सोमवारीआंदोलन केले. येथील नेताजी नगरजवळ असलेल्या पोलिसांचा बिनतारी संदेश टॉवरवर चढून ठोस कारवाई होईपर्यंत उतरणार नाही, असा इशारा दिला. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर तो खाली उतरला.
यवतमाळ : मुख्य आरोपीला अटक करण्यासाठी आरटीआय कार्यकर्त्याचे टॉवरवर चढून आंदोलन - आरटीआय कार्यकर्त्याचे टॉवरवर चढून आंदोलन
रेतीमाफियांनी माहिती अधिकार कार्यकर्त्याचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे तर विवस्त्र करत मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले. या गंभीर गुन्ह्यातील सूत्रधार अजूनही पसार आहे. त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी पीडिताने टॉवरवर चढून आंदोलन केले.
टॉवरवर चढून आंदोलन -चंदन हातागडे (रा. नेताजीनगर) यांचे 19 मे 2021 रोजी अपहरण करून रेतीमाफिया यांनी अपहरण केले व त्याला बेदम मारहाण केली. नग्न व्हिडिओ करून सोशल मीडियात व्हायरल केले. या प्रकरणात शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. मात्र, वर्ष लोटूनही प्रमुख आरोपींना अटक झालेली नाही. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. याचीही चौकशी योग्यरीत्या होत नाही. मागील सहा महिन्यापासून आरोपी मोकाट आहे. त्यांना एक प्रकारे अभय मिळत असल्याचे दिसते. सराईत व कुख्यात गुन्हेगारांबद्दल पोलिसांची इतकी मवाळ भूमिका सामाजिक स्वास्थ्यासाठी घातक ठरणारी आहे, असा आरोप चंदन हातागडे यांनी करीत चक्क सोमवारी टॉवरवर चढून विरू गिरी आंदोलन केले आहे.
यावेळी तहसीलदार कुणाला झाल्टे, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नंदकुमार पंत, नैसर्गिक आपत्ती विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.