महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...अन् जळत्या चितेवर कोसळले छत - यवतमाळ

पार्थिवाला अग्नी दिल्यानंतर काही क्षणातच नकळत मोठा आवाज झाला. त्याचवेळी सिमेंट काँक्रीटचा दहनशेडचे स्लॅब अचानक कोसळले. त्याखाली पार्थिव व सरण पूर्णपणे दबल्या गेले. सरणाजवळ जमलेली मंडळी बाजूला सरकल्याने प्राणहानी टळली.

कोसळले छत
कोसळले छत

By

Published : Jul 18, 2021, 7:23 PM IST

Updated : Jul 18, 2021, 7:54 PM IST

यवतमाळ- 'शेवटचा क्षण हा सुखाचा व्हावा', अशी भारतीय संस्कृतीत अपेक्षा व्यक्त केली गेली आहे. मात्र, पुसद तालुक्यातील निंबी येथे महिलेच्या अंत्यसंस्कारावेळी चक्क सिमेंट काँक्रिटचे छत जळत्या चितेवर अचानक कोसळले. सुदैवाने प्राणहानी टळली. मात्र चितेवरील पार्थिव अर्धवट जळाले. ही घटना दुपारच्या सुमारास घडली. या विचित्र प्रकारामुळे निंबी शिवारात नागरिकांनी संताप व्यक्त केला. त्याचवेळी ग्रामपंचायतने केलेल्या निकृष्ट बांधकामाचे पितळ उघडे पडले आहे.

जळत्या चितेवर कोसळले छत
अशी घडली घटना

पुसदपासून चार किलोमीटर अंतरावरील निंबी येथील रहिवासी महिला रूख्मा साहेबराव हराळ (५५) यांचे सकाळी आठ वाजता निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक व परिसरातील नागरिक जमले. दुपारी तीन वाजता स्मशानभूमीत ग्रामपंचायतने बांधलेल्या दहनशेडमध्ये सरण रचण्यात आले. पार्थिवाला अग्नी दिल्यानंतर काही क्षणातच नकळत मोठा आवाज झाला. त्याचवेळी सिमेंट काँक्रीटचा दहनशेडचे स्लॅब अचानक कोसळले. त्याखाली पार्थिव व सरण पूर्णपणे दबल्या गेले. सरणाजवळ जमलेली मंडळी बाजूला सरकल्याने प्राणहानी टळली. सिमेंट काँक्रीटच्या स्लॅबखाली दबलेल्या पार्थिव व सरणाला बाहेर कसे काढावे? असा मोठा प्रश्न अंत्यसंस्काराला जमलेल्या नागरिकांना पडला. दरम्यान सरपंच व ग्रामसेवकांना ही घटना कळविण्यात आली. परंतु सायंकाळपर्यंत घटनास्थळी कोणीही पोहोचले नव्हते. या दहनशेडचे ग्रामपंचायतीने तीन वर्षापूर्वीच बांधकाम केलेले आहे. निकृष्ट बांधकामामुळे हा अपघात घडला. याला जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Last Updated : Jul 18, 2021, 7:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details