महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धनदांडग्यांनी जबरदस्तीने बैलगाडी घुसवून शेतकऱ्याच्या शेती पिकांचे केले नुकसान

शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याच्या कारणावरून धनदांडग्या लोकांनी जबरदस्ती एका शेतकऱ्याच्या शेतात बैलगाडी घुसवून रस्ता तयार करण्याचा प्रयत्न केला. यामुळे शेतकऱ्याच्या पिकांचे नुकसान झाले आहे.

जबरदस्ती एका शेतकऱ्याच्या शेतात बैलगाडी घुसवून रसता तैयार करण्याचा प्रयत्न करताना लोकं

By

Published : Jul 8, 2019, 3:55 PM IST

यवतमाळ- शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याच्या कारणावरून धनदांडग्या लोकांनी जबरदस्ती एका शेतकऱ्याच्या शेतात बैलगाडी घुसवून रसता तैयार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या शेतकऱ्याच्या पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी या बाबतीत उमरखेड तहसिलदार आणि बिटरगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

जबरदस्ती एका शेतकऱ्याच्या शेतात बैलगाडी घुसवून रसता तैयार करण्याचा प्रयत्न करताना लोकं


जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील निंगणुर येथे मारुती कर्हे आणि दत्ता कर्हे या दोन भावांची साधारणत: साडेतीन एकर शेती आहे. शेतामध्ये ओलित व्यवस्था असल्याने ते बारमाही उत्पन्न घेतात. यंदा त्यांनी शेतात सोयाबीन, केळी, भेंडी आदी पिकांची लागवड केली आहे. मात्र, गावातीलच काही श्रीमंत धनदांडग्या लोकांनी त्यांच्या शेतात जाण्यासाठी कर्हे बंधुंच्या शेतातून रस्ता जवळ पडतो म्हणून बैलगाडी थेट त्यांच्या शेतात शिरवली व पिकांची नासधूस करत बैलगाडीने रस्ता तयार करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे यासंदर्भात निंगणुर गावातील पोलीस पाटील आणि गावाचे सरपंच व इतर लोकांनी धनदांडग्या लोकांना असे न करण्यास सांगितले होते. मात्र, त्यांच्या सांगण्याला न जुमानता सर्व १९ धनदांडग्यांनी एकत्र येत कर्हे यांच्या शेतातून वाट काढण्याचा प्रयत्न केला. यात शेतकऱयाचे मोठे नुकसान झाले.


विशेष म्हणजे या १९ जणांमध्ये स्त्री-पुरूष दोन्ही असल्याचे शेतकऱ्यानी सांगितले आहे. या लोकांनी शेतकऱ्याला जे होईल ते पाहून घेऊ म्हणत त्याच्या शेतातून बैलगाडी नेत रस्ता तयार करण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात शेतकऱ्यांनी उमरखेड येथील तहसीलदार व बिटरगाव पोलीस स्टेशन यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. आणि झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. ज्या लोकांनी या शेतकऱ्यांचे नुकसान केले ती सर्व गावातीलच लोकं आहेत. या सर्व घटनेचा व्हिडिओ शेतकऱ्यांनी स्वतः रेकॉर्ड केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details