यवतमाळ - शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवार भावना गवळी याचा उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे याचे आगमन झाल्यानंतर महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी त्यांना पुष्पगुच्छ देताना वाकून नमस्कार केला.
महसूल राज्यमंत्र्यांचा आदित्य ठाकरेंना वाकून नमस्कार, व्हिडिओ व्हायरल - यवतमाळ
शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवार भावना गवळी याचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यवतमाळ येथे आले होते. यावेळी महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी ठाकरेंना पुष्पगुच्छ देताना वाकून नमस्कार केला.

महसूल राज्यमंत्री संजय राठोड आदित्य ठाकरेंना वाकून नमस्कार करताना
महसूल राज्यमंत्री संजय राठोड आदित्य ठाकरेंना वाकून नमस्कार करताना
शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवार भावना गवळी याचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यवतमाळ येथे आले होते. यावेळी त्यांच्यासोबत खासदार अनिल देसाईसुद्धा उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयात ठाकरेंचे आगमन झाल्यानंतर त्यांना महसूल राज्यमंत्री राठोड यांनी वाकून नमस्कार केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, एक जबाबदार मंत्री, अशा पद्धतीने नमस्कार करत असल्याचे सांगून विरोधक यावर टीका करत आहेत.