यवतमाळ - जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले आहेत. ग्रामपंचयात निवडणुकीत काँग्रेसने भरारी घेतली आहे (congress gain). 70 पैकी 33 ग्रामपंचायती काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधीनी आपापल्या भागातील ग्रामपंचायती आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळविले. निकालानंतर विजयी उमेदवार तसेच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला (Yavatmal gram panchayat elections).
अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला -जिल्ह्यातील 72 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणुकीचे चित्र मतमोजणीनंतर स्पष्ट झाले आहे. 72 ग्रामपंचायतीपैकी पांढकरवडा तालुक्यातील आसोली तसेच राळेगाव तालुक्यातील भिमसेनपुर या दोन ग्रामपंचायती आधीच विनविरोध झाल्या. उर्वरीत 70 ग्रामपंचायतीसाठी रविवार (ता.18) मतदान झाले. या निवडणुकीत अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. शिवाय, राज्यात सत्ताबदल झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणुक होती.