महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Rescue Of Nine People : गर्भवती महिलेसह सावंगी गावातील नऊ जणांची पुरातून सुटका; प्रशासनाला सहकार्य करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

यवतमाळ जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू ( Rain continues in Yavatmal ) आहे. वणी तालुक्यातील ( Flood in Wani taluka ) जुगाद, साखरा, सावंगी, घोन्ता, कवडसी, दहेगाव, चिंचोली या गावांमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आज नवीन सावंगी येथून आजारी असलेल्या ९ लोकांना शोध व बचाव पथकाने पुराच्या पाण्यातून सुरक्षितरित्या बाहेर काढले आहे. यामध्ये एका गर्भवती महिलेचा समावेश आहे.

Nine rescued from flood
नऊ जणांची पुरातून सुटका

By

Published : Jul 14, 2022, 11:06 PM IST

यवतमाळ - यवतमाळ जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू ( Rain continues in Yavatmal ) आहे. यामुळे वणी तालुक्यात नदी, नाल्यांना पूर ( Flood in Wani taluka ) आला आहे. निरगुडा नदीच्या काठी वसलेल्या नविन आणि जुन्या सावंगी गावाचा बॅक वॉटरमुळे संपर्क तुटला आहे. आज नवीन सावंगी येथून आजारी असलेल्या ९ लोकांना शोध व बचाव पथकाने पुराच्या पाण्यातून सुरक्षितरित्या बाहेर काढले आहे. यामध्ये एका गर्भवती महिलेचा समावेश आहे.

नऊ जणांची पुरातून सुटका

९ लोकांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले -वणी तालुक्यातील ( Flood in Wani taluka ) जुगाद, साखरा, सावंगी, घोन्ता, कवडसी, दहेगाव, चिंचोली या गावांमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. निरगुडा नदी वर्धा नदीला मिळते. मात्र, वर्धा नदीच्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात बॅकवॉटरचा वेढा गावांना बसत आहे. सावंगी या गावाला सुद्धा एक ते दीड किलोमीटर बॅकवॉटरचा वेढा बसलेला आहे. नवीन सावंगी आणि जुन्या सावंगी यामध्ये मोठ्या प्रमाणात बॅक बटर असल्यामुळे दोन्ही गावांचा एकमेकांशी संपर्क तुटलेला आहे. नवीन सावंगी मध्ये सुमारे हजार लोकवस्ती असून शोध व बचाव पथक तैनात ( Search and rescue teams deployed in savangi ) करण्यात आले आहे. आज येथील ९ लोकांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले. यामध्ये एका नऊ महिन्याच्या गर्भवती महिले सोबत ३ मुलांचा तसेच मूत्रपिंड आजाराने ग्रस्त असलेल्या वृद्ध व्यक्तीचा समावेश आहे.

हेही वाचा -Maharashtra and India Rain live : देशातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस ! गुजरात आणि महाराष्ट्रात रेड अलर्ट, पाहा पावसाची स्थिती

बाहेर काढलेल्या व्यक्तींमध्ये रामचंद्र गोपाळा वाघमारे, शांता रामचंद्र वाघमारे , बंडू रामचंद्र वाघमारे, विजू खिरटकर, वेदांत विजू खिरटकर, मनीष विजू खिरटकर, प्रदीप आसुटकर, निराक्रश प्रदीप आसुटकर, तसेच गर्भवती महिलेचा समावेश आहे. या कुटुंबीयांना सुरक्षित बाहेर काढल्याबद्दल जिल्हाधिकारी अमोल येडगे ( Collector Amol Yedge ) यांनी शोध व बचाव पथकातिल कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन चमू ( Disaster Management Team ) परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन पथकामार्फत तसेच जिल्हा प्रशासनामार्फत ( Yavatmal District Administration ) देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे. पुराच्या पाण्यात किंवा पुलावरून पाणी वाहत असताना कोणीही पाण्यात जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

तहसिलदार चमु परिस्थितिवर लक्ष ठेवून -गर्भवती महिलेची ग्रामीण रुग्णालयात तपासणी करून तिला माहेरी पाठविण्यात आले आहे, तसेच इतर व्यक्तिना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. 15 लोकांच्या शोध व बचाव पथकाची चमु यावेळी उपस्थित होती. उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार निखिल धुळधर, महसूल, पोलीस व नगर परिषद विभागाची चमु, पोलीस कॉन्स्टेबल पुकार वाकोडे, अमर भवरे, सागर केराम, सुभान अली, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातून पाठविण्यात आलेल्या व्यक्तींचा यामध्ये समावेश होता.

हेही वाचा -Tractor Plunged into Water : गुजरातमध्ये मुसळधार पाऊस; खारी नदीत ट्रॅक्टर गेला वाहून, पाहा Video

ABOUT THE AUTHOR

...view details