महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळमध्ये आधार कार्ड नसल्याने प्रसुतीसाठी दाखल करुन घेण्यास ग्रामीण रुग्णालयाने नकार दिल्याचा नातेवाईकांचा आरोप - यवतमाळ जनहित कल्याण संघटना

मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयाने प्रसुतीसाठी आलेल्या गर्भवती महिलेस आधारकार्ड नसल्याने दाखल करुन घेण्यास नकार दिल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. यावेळी तिच्या मदतीला सामाजिक संघटना धावून आल्याने एका खासगी रुग्णालयात तिची प्रसुती सुखरुप झाली.

यवतमाळ
यवतमाळ

By

Published : Aug 11, 2022, 7:52 AM IST

यवतमाळ -आधार कार्ड विना प्रसूती करिता ग्रामीण रुग्णालय मारेगावने परत पाठवल्याचा आरोप भटक्या जमातीतील एका गर्भवती महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यानंतर त्या मातेला येथील स्थानिक सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी लोढा हॉस्पिटलमध्ये तत्काळ भरती केले असता तिने एका गोडस बाळाला जन्म दिला. माता व बाळा आता सुखरूप आहे.



आधार कार्ड नसल्याने तिला परत पाठवले -शहरात आंबेडकर चौक परिसरात एका लोहार भटक्या समाजातील कुटूंब लोखंडी वस्तू तयार करण्याचा व्यवसाय रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून करत होते. दरम्यान अर्चना सोळंके नामक गर्भवती महिला प्रसूतीच्या वेदनेत कळा तिला असह्य होत असल्याने तिच्या कुटूंबानी तिला घेवून थेट ग्रामीण रुग्णालय गाठले. यावेळी तिचे आधार कार्ड नसल्याने तिला परत पाठवण्यात आले. तिच्या वेदनेला पाहून तिचे कुटूंब इकडे तिकडे शहरात फिरून मदतीची कोणीच जात नव्हते. दरम्यान ही बाब जनहित कल्याण संघटना मारेगाव व क्रांती युवा संघटना वणीच्या पदाधिकाऱ्यांना लक्षात येताच कुठलाच विलंब न करता त्यांनी थेट वणी येथील प्रसिद्ध लोढा हॉस्पिटलमध्ये भरती केले. त्यानंतर तेथील डॉक्टरांनी तिची सुखरुप बाळंतपण केले.

हे आले मदतीला धावून - राकेश खुराणा,गौरीशंकर खुराणा, अॅड. सुरज महारतळे, विजया ताई कांबळे, समीर कुलमेथे,रॉयल सयद,निलेश तेलंग, प्रफुल
हे सर्व कार्यकर्ते या मातेच्या मदतीला धावून आले. तसेच तिच्या संपूर्ण बाळंतपणाचा खर्च जनहित व क्रांती संघटनेने केला. ग्रामीण रुग्णालयने तिला आधार कार्ड विना प्रसूतीस नकार देवून तिला परत पाठवले. मात्र जनहित कल्पना व क्रांती युवा संघटनेने तिला मदतीचा आधार दिला. यावेळी प्रफुल ऊरकडे, गौरव आसेकर,धीरज डांगाले,राजू गव्हाणे आदी जनहित कल्याण व क्रांती युवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तिच्या मदतीसाठी परिश्रम घेतले.

ABOUT THE AUTHOR

...view details