महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

I Card provide to Transgender : महिला काँग्रेस पक्षाने तृतीय पंथीयांना मिळवून दिला हक्क - रेशन कार्ड

समाजात तृतीय पंथीयांना ( Transgender ) अभिमानाणे जगता यावे, त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवावा, एक स्वतंत्र ओळख मिळावी यासाठी महिला काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी ( Women Congress State President sandhya sawalakhe ) शासनाकडे पाठपुरावा केला. अखेर शासनाने तृतीय पंथीयांना आयडी कार्ड, रेशन कार्ड, पेन्शन योजना लागू केली. 26 जानेवारीला पालघर जिल्हाधिकारी यांच्याहस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

पालघर येथील छायाचित्र
पालघर येथील छायाचित्र

By

Published : Jan 29, 2022, 9:05 PM IST

यवतमाळ - समाजात तृतीय पंथीयांना अभिमानाणे जगता यावे, त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवावा, एक स्वतंत्र ओळख मिळावी यासाठी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे ( Women Congress State President sandhya sawalakhe ) यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. अखेर शासनाने तृतीय पंथीयांना आयडी कार्ड, रेशन कार्ड, पेन्शन योजना लागू केली. 26 जानेवारीला पालघर जिल्हाधिकारी यांच्याहस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

बोलताना संध्या सव्वालाखे

या शासनाच्या निर्णयामुळे राज्यातील जवळपास एक लाखावर तृतीय पंथीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्व तृतीयपंथीयांना अशक्य वाटणारे काम महाराष्ट्र प्रदेश तृतीयपंथी सेल अध्यक्षा पवनजी यादव यांनी पालघर याठिकाणी त्यांना रेशन कार्ड व पेन्शन देऊन शुभारंभ करण्यात आला. पवनजी यादव यांच्याशी संपर्क साधला असता महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले व महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा संध्या सव्वालाखे त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. आम्हाला काँग्रेस पक्षाकडून मिळालेली ताकत आम्ही कधीही विसरणार नाही. अजून आम्हाला पूर्ण महाराष्ट्रात काम करायचा आहे. या संधीचे आम्ही नक्कीच सोने करू, असे सांगितले. तसेच महाराष्ट्रातील सर्व तृतीयपंथीयांना प्रमाणपत्र देण्यासाठी लवकरच काँग्रेस पक्षाकडून शिबीर घेऊन त्यांची नोंदणी कार्यक्रम घेण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हा व तालुका स्तरावर त्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी सांगितले.

हेही वाचा -Yavatmal Congress : यवतमाळमध्ये सत्ताधारी काँग्रेसच्या नेत्यांकडूनच कोरोनाचे नियमांचे उल्लंघन

ABOUT THE AUTHOR

...view details