यवतमाळ - संततधार पावसामुळे विदर्भ-मराठवाडा सीमेवर असलेल्या पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधबा (Sahatrakund Waterfall) ओसंडून वाहू लागला. या पाण्यामुळे जेवली रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने गावांचा संपर्क तुटला. या पुलाची उंची अतिशय कमी आहे. त्यामुळे थोडासा जरी पाऊस झाला तरी हा पूल पाण्याखाली जातो आणि याचा त्रास सहस्त्रकुंडला येणाऱ्या पर्यटकांसोबतच परिसरात नागरिकांना सहन करावा लागत आहे.
Rain : जेवली रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने गावांचा संपर्क तुटला - Sahatrakund Waterfall
या पुलाची उंची अतिशय कमी आहे. त्यामुळे थोडासा जरी पाऊस झाला तरी हा पूल पाण्याखाली जातो आणि याचा त्रास सहस्त्रकुंडला येणाऱ्या पर्यटकांसोबतच परिसरात नागरिकांना सहन करावा लागत आहे.
वाहतूक ठप्प
या बरोबरच जेवली ते सोनदाभी या रस्त्यावरील दोन पूलसुद्धा नेहमीच पाण्याखाली जातात. पुलावरून पाणी वाहत असल्याने यवतमाळ जिल्ह्यातील काही पर्यटक अडकून पडले आहे. काही नागरिक घरी जाण्याच्या घाईत जीव धोक्यात घालून पूल ओलांडण्याचा प्रयत्न करत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाला हा प्रकार चांगल्या प्रकारे माहीत असून त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे पाऊल उचलले जात नाही. त्याबद्दल नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. पुरामुळे विदर्भ- मराठवाड्याला जोडणाऱ्या दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. नागरिकांनी पुलावरून पाणी असताना जाऊ नये, असे आवाहन उमरखेडचे तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी केले आहे.