यवतमाळ - येथे गुरुवारी मध्यरात्री 1 च्या सुमारास शहरातील विद्यानगरी येथील आरआर ढाबा येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वणी पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत 13 जणांना अटक करण्यात आली. तसेच, त्यांच्याकडून एकूण 3 लाख 27 हजार 500 रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
यवतमाळमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; 3 लाखांच्या मुद्देमालासह 13 जण अटकेत - यवतमाळ जुगार बातमी
वणी पोलिसांना विद्यानगरी येथील आरआर ढाबा येथे काही व्यक्ती जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे डीबी प्रमुख गोपाल जाधव आपल्या सहकाऱ्यांना घेऊन घटनास्थळी रवाना झाले. यावेळी धाब्याच्या मागील टिन शेडमध्ये काही व्यक्ती पत्त्यांचा जुगार खेळत असल्याचे दिसून आले. त्यांनी लगचे छापा टाकून 13 जुगाऱ्यांना अटक केली.
![यवतमाळमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; 3 लाखांच्या मुद्देमालासह 13 जण अटकेत यवतमाळमध्ये जुगार अड्ड्यावर छापा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-04:32:06:1592564526-mh-ytl-03-wani-jugar-vis-byte-7204456-19062020162340-1906f-1592564020-13.jpg)
वणी पोलिसांना विद्यानगरी येथील आरआर ढाबा येथे काही व्यक्ती जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे डीबी प्रमुख गोपाल जाधव आपल्या सहकाऱ्यांना घेऊन घटनास्थळी रवाना झाले. यावेळी धाब्याच्या मागील टिन शेडमध्ये काही व्यक्ती पत्त्याचा जुगार खेळत असल्याचे दिसून आले. त्यांनी लगचे छापा टाकून 13 जुगाऱ्यांना अटक केली. यात राहुल नागतुरे (32, काजीपुरा), शुभम टेकाम (24), किसन पेटकर (27), विजय बोधने (32), अमोल ठाकरे (26), विठ्ठल कष्टी (39), निखिल धारने (28), गौरव टोंगे (25), दिनेश बदखल (35), प्रतीक चिडे (22), अविनाश सोनूले (25), अक्षय दंडाज (22), मंगेश वैद्य (30) यांचा समावेश आहे.
दरम्यान, विद्या नगरीतील आरआर ढाबा येथे नेहमीच जुगार भरत असल्याची चर्चा सुरू आहे. या ठिकाणी शहरातील प्रतिष्ठित नागरिक जुगार खेळण्यासाठी येत असून 5 ते 10 लाखांवर जुगार भरत होता. मात्र, पोलिसांना आज कशी माहिती मिळाली आणि करवाई केली याचे कुतूहल नागरिकांना पडले आहे. तर, पकडण्यात आलेल्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक व ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी प्रमुख पीएसआय गोपाल जाधव, सुदर्शन विनोळे, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, रत्नपाल मोहाडे, अमित पोयाम, दीपक वाड्रसवार, पंकज उंबरकर यांनी केली.