महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोहरादेवी येथील जगदंबा माता मंदिराचे शुद्धीकरण - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण

बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथे येऊन वनमंत्री संजय राठोड यांनी स्वतःला निष्पाप घोषित केले होते.

Purification of Jagdamba Mata Mandir at Pohardevi
पोहरादेवी येथील जगदंबा माता मंदिराचे शुद्धीकरण

By

Published : Feb 28, 2021, 6:42 PM IST

यवतमाळ -बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथे येऊन संजय राठोड यांनी स्वतःला निष्पाप घोषित केले होते. दरम्यान, मुंबई येथील सामाजिक कार्यकर्त्या योगिता साळवी, स्मिता कवडे, ज्योती साठे यांनी पोहरादेवी येथील जगदंबा माता मंदिराचे शुद्धीकरण केले. तसेच पूजा चव्हाणला न्याय मिळावा यासाठी साकडे घातले.

दोषींवर कारवाई झालीच पाहिजे-

पूजा चव्हाणने आत्महत्या केली की हत्या झाली, हे अद्यापही समोर आले नाही. मात्र, यात संजय राठोड यांच्यावर आरोप होत आहे. त्यामुळे संजय राठोड पोहरादेवी येथे जाऊन आपण निष्पाप असल्याची कबुली दिली होती. तसेच मृत्यूसाठी जे कुणी दोषी असतील त्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे,अशी मागणी यवतमाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली होती.

सामाजिक कार्यकर्त्या योगिता साळवी

संजय राठोड यांचा मंत्रिपदाचा राजीनामा-

मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे, असे संजय राठोड यांनी जाहीर केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आमच्या समाजाच्या तरूणीच्या मृत्यूवरून विरोधी पक्षाने मला, माझ्या समाजाची बदनामी केली, असेही ते म्हणाले. तर संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांकडून सरकारवर दबाव टाकण्यात येत होता. भाजपच्या वतीने राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनेही करण्यात आली होती.

सत्य बाहेर येऊ द्या, ही माझी भूमिका आहे. विरोधकांमुळे माझ्या वैयक्तिक जीवनावर जो परिणाम होत आहे, त्यामुळे मी पदावरून दूर होत आहे. माझे राजकारण संपवण्याचा प्रयत्न केला गेला, असा आरोपही त्यांनी विरोधकांवर केला. तसेच या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली. मी राजीनामा देऊन बाहेर आलो आहे. राजीनामा देताना अनिल देसाई आणि अनिल परबही सोबत होते, असेही त्यांनी सांगितले.

पोहरादेवी गर्दी प्रकरणी हजारोंवर गुन्हे दाखल; वनमंत्री राठोडांसह महंतांचे नाव नाहीच -

वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे संजय राठोड यांच्या समर्थनात त्यांचे समर्थक कोरोनाचे नियम असताना हजारोच्या संख्येने जमा झाले होते. त्यानंतर राठोड यांच्यावर टीकेची झोड उठली होती. तसेच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीदेखील मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे नारादी व्यक्त केली होती. त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीच्या आदेशान्वये पोलिसांनी वन मंत्री संजय राठोड यांच्या सुमारे 10 हजार समर्थकांवर गुन्हे दाखल केले आहेत. मात्र यामध्ये पोहरादेवी येथील महंतांचे आणि खुद्द संजय राठोड यांच्या नावाचाच समावेश नाही.

पुणे येथील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अडचणीत आलेले संजय राठोड हे पंधरा दिवस नॉटरिचेबल होते. त्यानंतर वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवी येथील महंतांनी त्यांना पोहरादेवी येथे दर्शनासाठी निमंत्रण दिले होते. त्या निमंत्रणाला मान देऊन संजय राठोड हे पोहरादेवी येथे दर्शनासाठी आले, मात्र त्यांच्या समर्थनाकरिता हजारोच्या संख्येत त्यांचे समर्थक पोहरादेवी येथे जमा झाले.

क्लिपमधील आवाज कोणाचा आहे, हे सर्वांनाच माहिती -

पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केल्यानंतर सोशल मीडियातून कथितरित्या या प्रकरणाशी संबंध असलेल्या काही ऑडियो क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या. यानंतर कथितरित्या राज्य सरकारमधील एका मंत्र्याचे नाव या प्रकरणाशी जोडले गेले. यावर बोलताना, या क्लिपमधील आवाज कोणाचा आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. परंतु पोलिसांनी यासंदर्भात खुलासा करायला हवा, अशी विरोधकांकडून करण्यात येत होती.

हेही वाचा-मी बाजूला राहून चौकशी व्हावी म्हणून राजीनामा - संजय राठोड

ABOUT THE AUTHOR

...view details