यवतमाळ -जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिकारी कमी पडल्याचे चित्र आहे. मात्र, अधिकारी त्यांचे काम करत असले तरी अधिकाऱ्यांपेक्षा नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे, असा सल्ला आमदार संजय राठोड यांनी यवतमाळ जिल्ह्यातील जनतेला दिला. अधिकारी आज आहेत, उद्या ते दुसऱ्या जिल्ह्यात जातील, मात्र कोरोनात स्वतःची काळजी घेण्याची जबाबदारी जनतेची आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
खबरदारीशिवाय कोरोनाचा पराभव अशक्य -
जनतेला कोरोना काळात योग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. त्यातून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभे राहिले. व्हीआरडीएल लॅब चांगले काम करत आहे. खबरदारी घेतल्याशिवाय कोरोनाचा पराभव अशक्य आहे, अशी मतही राठोड यांनी व्यक्त केले. कोरोनामुळे दररोज मृत्यू होत आहेत. अनेक ठिकाणी मृत्यू रेकॉर्डवर येत नाही. आगामी काळात कोरोनाला पराभूत करायचे असेल तर, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन जनतेने करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले.
हेही वाचा - किमान 15 दिवसांचा कडकडीत बंद पाळायलाच हवा - मुंबई उच्च न्यायालय