महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राळेगाव, यवतमाळला मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे - yavatmal bjp

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने संपूर्ण राज्यात महाजनादेश यात्रा सुरू केली आहे. ही यात्रा सोमवारी यवतमाळ जिल्ह्यात दाखल झाली. यावेळी फडणवीस यांना ठिकठिकाणी काळे झेंडे दाखवण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ठिकठिकाणी काळे झेंडे दाखवण्यात आले.

By

Published : Aug 5, 2019, 11:40 PM IST

Updated : Aug 5, 2019, 11:54 PM IST

यवतमाळ-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनदेश यात्रेचे सोमवारी यवतमाळ जिल्ह्यात आगमन झाले. मात्र, जिल्ह्यात ही यात्रा पोहचताच ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनाचा सामना या यात्रेला करावा लागला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ठिकठिकाणी काळे झेंडे दाखवण्यात आले.

सर्वात आधी राळेगाव येथे मुख्यमंत्री यांची यात्रा पोहचताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून आंदोलन केले. त्यानंतर यवतमाळ येथे यात्रा पोहचताच प्रहार संघटनेचे नितीन मिर्जपुरे यांनी पोस्ट ऑफिस चौकात काळे झेंडे दाखवून आंदोलन केले.

त्यानंतर सभा स्थळी मुख्यमंत्री पोहचले. भाषणाला सुरुवात केल्यानंतर पुन्हा प्रहारच्या काही कार्यकर्त्यांनी भाषणा दरम्यान नारेबाजी केली. त्यांना तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतले. मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना नारेबाजी करण्यांकडे पाहून मुख्यमंत्री यांनी उपस्थित लोकांना 'जाऊ द्या, सोडून द्या, एखादा नमुना असतो,' असे सांगत 'भारत माता की जय'च्या घोषणा दिल्या.

Last Updated : Aug 5, 2019, 11:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details