महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी, दुर्गम भागाकडे विशेष लक्ष - जिल्हाधिकारी

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासून बचावासाठी जिल्ह्याच्या ठिकाणापासून दूर असलेल्या वणी, पुसदव उमरखेड या भागातील नागरिकांसाठी नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

By

Published : Jul 4, 2021, 5:35 PM IST

यवतमाळ -कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासून बचावासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना जिल्हा मुख्यालयापासून दूर असलेल्या वणी, पुसद व उमरखेड या दुर्गम भागासाठी नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली. या भागा कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्यास ऑक्सीजन व इतर कोरोना प्रतिबंधात्मक साहित्य तातडीने उपलब्ध व्हावेत, यासाठी आवश्यक नियोजन व बफर स्टॉक, अशी संपूर्ण तयारी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

शहराकडे धाव घेण्याची पडू नये गरज

भविष्यात कोरोनाचा प्रकोप वाढल्यास ग्रामीण भागातील नागरिकांना उपचारासाठी शहराकडे धाव घेण्याची गरज पडू नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. स्थानिकांसाठी तालुका स्तरावरील उपजिल्हा रुग्णालय व कोविड केअर सेंटरवरच सोय व्हावी, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

तीनपट जास्त ऑक्सीजन

जिल्ह्यात दुसऱ्या लाटेच्या तीनपट जास्त ऑक्सीजन क्षमता वृद्धींगत करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, त्यापेक्षाही जास्त ऑक्सीजन सुविधा येथे उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच तालुकास्तरावरील सर्व शासकीय उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सीजन बेडची सुविधा उपलब्ध करण्यात आले आहे. जिल्ह्यात सध्या 63.93 मेट्रीक टन ऑक्सीजन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे तर 68.21 मेट्रीक टन ऑक्सीजन साठ्याची प्रस्तावीत कामे लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्ह्यात एकूण 132.14 मेट्रीक टन ऑक्सीजन क्षमतेचा साठा तयार होणार आहे. वणी, पांढरकवडा, उमरखेड व पूसद येथे पी.एस.ए. प्लन्ट उभारण्यात येत असून ते लवकरच कार्यन्वित होणार आहे. जिल्हा स्तरावर 290 सिलिंडरचा स्टॉक ठेवण्यात आला आहे. तसेच नव्याने उपलब्ध होणाऱ्या सिलिंडरमधून वणी, उमरखेड व यवतमाळ येथे प्रत्येकी 75 जम्बो सिलेंडर बफर स्टॉकमध्ये ठेवण्यात येतील, असे जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले.

लहान मुलांसाठी बेड्सची व्यवस्था

लहान मुलांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ येथे 60 बेड्स, स्त्री रुग्णालयात 40 तसेच पुसद, पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रत्येकी 20 बेड्स तयार करण्यात आलेले आहे. ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रूग्णालयातील बेडची क्षमता वाढवण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

हेही वाचा -यवतमाळमध्ये लहान मुलांसह म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी वेगळ्या वॉर्डाचे नियोजन

ABOUT THE AUTHOR

...view details