यवतमाळ - शहरातील 'प्रतिसाद' या समाजसेवी संस्थेने अनोळखी इसमाचा रितीरिवाजाप्रमाणे अंत्यविधी करून सामाजिक बांधीलकी जपली आहे. वाघापूर मोक्षधाम येथे हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे हा अंत्यविधी पार पाडला.
अनोळखी व्यक्तीचा रितीरिवाजाप्रमाणे केला अंत्यविधी; प्रतिसाद फाउंडेशनची सामाजिक बांधिलकी - प्रतिसाद फाउंडेशन अनोळखी इसमाचा अंत्यविधी
शहरात मोबाईलवर बस स्थानक परिसरात एक अनोळखी मृतदेह पडून असल्याचा मेसेज व्हायरल झाला होता. माहिती मिळताच प्रतिसाद फाऊंडेशनच्या समाजसेवकांनी घटनास्थळ गाठले. अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्याची प्रक्रिया झाली. परंतु पोलीस प्रशासनालासुद्धा या मृतदेहाची ओळख पटू शकली नाही. त्यामुळे या व्यक्तीच्या अंत्यविधीची जबाबदारी प्रतिसाद फाउंडेशनने उचलली.
हेही वाचा -यवतमाळमध्ये नऊ महिन्यापासून ग्रामसेवक बेपत्ता; ग्रामस्थांची बीडीओकडे तक्रार
शहरात मोबाईलवर बसस्थानक परिसरात एक अनोळखी मृतदेह पडून असल्याचा मेसेज व्हायरल झाला होता. माहिती मिळताच प्रतिसाद फाऊंडेशनच्या समाजसेवकांनी घटनास्थळ गाठले. अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्याची प्रक्रिया झाली. परंतु पोलिस प्रशासनालासुद्धा या मृतदेहाची ओळख पटू शकली नाही. त्यामुळे या व्यक्तीच्या अंत्यविधीची जबाबदारी प्रतिसाद फाउंडेशनने उचलली. यावेळी, पोलीस प्रशासनातर्फे अवधूतवाडी पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल प्रशांत झोड, चंद्रपूर येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी वैभव गूल्हाने, प्रतिसाद फाऊंडेशनचे अध्यक्ष मनोज गुल्हानेसह संस्थेचे सदस्य उपस्थित होते.