महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 20, 2019, 8:50 PM IST

Updated : Sep 20, 2019, 10:35 PM IST

ETV Bharat / state

'एका टाळीसाठी 86 मतदारसंघातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अमेरिकेला विकले'

गुजरातच्या बंदरात अमेरिकेतून  4 बोटी आल्या असून 4 हजार प्रती क्विंटलने तेथून कापूस आणला आहे, असा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

प्रकाश आंबेडकर

यवतमाळ- सध्या कापसाचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. हे सर्व सरकारमुळे झाले आहे. मोदी सरकारने एका टाळीसाठी राज्यातील 86 मतदारसंघातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अमेरिकेला विकले आहे, असे खळबळजनक विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. ते यवतमाळ येथे बोलत होते.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया

गुजरातच्या बंदरात अमेरिकेतून 4 बोटी आल्या असून 4 हजार प्रती क्विंटलने तेथून कापूस आणला आहे. आमची सत्ता राज्यात आली तर भारताच्या कुठल्याही बंदरात अमेरिकेचा कापूस येऊ देणार नाही आणि अशा अमेरिकेच्या बोटी जाळण्यासाठी आम्हाला राज्यात सत्ता हवी आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.

हेही वाचा- मी अजून म्हातारा झालेलो नाही, माझी ताकद काय आहे, हे मी दाखवून देईल- शरद पवार

वंचितची यादी दोन तीन दिवसांत येईल

आम्ही काँग्रेसला 144 जागेचा प्रस्ताव दिला होता. मात्र, तो त्यांनी मान्य केला नाही. वंचित आघाडीच्या उमेदवारांची यादी दोन तीन दिवसांत येईल, असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

हेही वाचा- मनसे निवडणूक लढण्याची शक्यता, राज ठाकरे घेणार अंतिम निर्णय

शेतकरी आत्महत्येला स्वत: शेतकरीच जबाबदार

शेतकरी आत्महत्या करतो यासाठी तो स्वत: च जबाबदार आहे. तो व्यवस्थेमुळे नाही तर स्वतः मुळे आत्महत्या करतो. कारण शेतकरी हा जात पाहून मतदान करतो. जात पाहून मतदान केल्याने कापसाला भाव मिळत नाही. म्हणून जात पाहून मतदान न करता वंचितला साथ दिली तर कापसाला भाव देऊ, असे विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राळेगाव येथे बोलताना केले.

वंचित बहुजन आघाडीतर्फे राळेगाव येथे आदिवासी गोवारी समाज सत्ता संपादन मेळावा घेण्यात आला. यावेळी त्यांनी हे विधान केले आहे. आंबेडकर पुढे म्हणाले महाराष्ट्र सरकारने महिलांना त्रास होऊ नये म्हणून उज्वला गॅस योजना सुरू केली. त्यातून कमी पैशात गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिल्याची जाहिरात केली. परंतु तसे झाले नाही. जनतेला पुढील सिलिंडरमध्ये सबसिडी न देता हप्ता वसुली केली, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

Last Updated : Sep 20, 2019, 10:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details