महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

1 लाखांची लाच घेताना फौजदाराला अटक - Yavatmal Latest News

छापा मारण्याची भीती दाखवून फटाका व्यवसायिकाकडून एक लाखांची लाच स्वीकारताना एका फौजदाराला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. राजाभाऊ घोगरे (35, रा. घाटंजी) असे या लाचखोर पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

1 लाखांची लाच घेताना फौजदाराला अटक
1 लाखांची लाच घेताना फौजदाराला अटक

By

Published : Jan 4, 2021, 10:22 PM IST

यवतमाळ -छापा मारण्याची भीती दाखवून फटाका व्यवसायिकाकडून एक लाखांची लाच स्वीकारताना एका फौजदाराला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. राजाभाऊ घोगरे (35, रा. घाटंजी) असे या लाचखोर पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या कारवाईने घाटंजीमध्ये खळबळ उडाली आहे.

छापा न टाकण्यासाठी पैशांची मागणी

घाटंजी येथील रहिवासी असलेल्या व्यक्तीचा परवानाकृत फटक्याचा व्यवसाय आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या फटाक्याच्या परवान्याची मुदत संपली होती. तेव्हा त्याने परवाना नुतणीकरणासाठी रीतसर प्रक्रिया केली. मात्र तांत्रिक अडचणींमुळे त्याच्या परवान्याचे नुतणीकरण झाले नाही. ही बाब माहिती होताच फौजदार राजाभाऊ घोगरे याने त्यांच्याशी संपर्क साधला. परवाना नसल्याने पोलीस अधीक्षकांकडून दुकानावर छापा पडणार असल्याची खोटी भीती त्याने या व्यवसायिकाला दाखवली. तसेच छापा थांबवण्यासाठी त्यांच्याकडे 6 लाखांची मागणी केली.

पोलीस ठाण्यातच रचला सापळा

संबंधित व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय गाठून याबाबत पोलीस उपअधीक्षक आर. बी. मुळे यांच्याकडे तक्रार दिली. तक्रार दाखल होताच लाचलुचपत विभागाकडून तक्रारीची पडताळणी करण्यात आली. तडजोडीनंतर घोगरे याने 1 लाख घेण्याचे मान्य केले. सोमवारी लाचलुचपत विभागाने घाटंजी पोलीस ठाण्यातच सापळा रचून आरोपीला लाच घेताना अटक केली.

ABOUT THE AUTHOR

...view details