यवतमाळ : नागपूर-तुळजापूर महामार्गावरील मंगरूळ या गावानजीक पोलीस व्हॅन आणि आयशर ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात होऊन पोलीस व्हॅन चालकाला गंभीर दुखापत झाली. पोलीस व्हॅनमधील दोन कर्मचाऱ्यांना किरकोळ मार लागला असून त्यांना यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी आयशर ट्रकचा चालक घटनास्थळावरून पळून गेला.
यवतमाळ : आरोपी सोडून येताना पोलीस व्हॅन आणि ट्रकची धडक - Yavatmal latest news
आरोपींना सोडून येताना पोलीस व्हॅन आणि ट्रकचा अपघात झाला. या अपघातात पोलीस व्हॅन चालक गंभीर जखमी झाला आहे.
यवतमाळवरून आरोपींना सोडण्यासाठी पोलीस व्हॅन (एम.एच.२९ एम ९५३३) पुसद येथे गेली होती. परत मुख्यालय यवतमाळकडे येत असताना नागपूरवरून सोलापूर येथे पोहा घेऊन जाणारी आयशर गाडी (एम.एच.१३ सि.यु.६५९८) पोलीस व्हॅन या दोन्ही वाहनांची समोरासमोर मंगरूळ येथे धडक झाली. या अपघातात पोलीस व्हॅनचा चक्काचूर झाला. यात पोलीस चालक सुनील केसगिर हे गंभीर जखमी झाले आहेत. पोलीस सहायक मुस्ताक पठाण व हरीश भावेकर यांनाही किरकोळ मार लागला असून त्यांच्यावर यवतमाळ येथील वसंतराव नाईक रुग्णालयात उपचार दाखल करण्यात आले. याबाबत राजेंद्र जाधव यांनी तक्रार दाखल केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय शिंदे करीत आहेत.