यवतमाळ - जिल्ह्यातील राळेगाव पोलिसांनी कत्तलीसाठी जाणाऱ्या वाहनाला जप्त करून 8 गाईंची सुटका केली आहे. ही कार्यवाही मध्यरात्री मोठ्या शिताफीने राळेगाव पोलिसांनी केली.
कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या ८ गाईंची सुटका; राळेगाव पोलिसांची कारवाई - राळेगाव पोलीस न्यूज
यवतमाळ जिल्ह्याील राळेगाव पोलिसांनी कत्तलीसाठी जाणाऱ्या वाहनाला जप्त करून 8 गाईंची सुटका केली आहे.
कत्तलीसाठी जाणाऱ्या ८ गाईंची सुटका
एका चारचाकी (एम एच 32 क्यू 3455) वाहनाने 8 गायी कत्तलीसाठी जात असल्याची गुप्त माहिती राळेगाव पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या गाडीचा पाठलाग करून गाडी जप्त केली. या कारवाईत एकूण सुमारे चाडेचार लाखांचा माल जप्त करण्यात आला. यामधील आरोपी फरार झाला आहे. पुढील तपास राळेगाव पोलीस करीत आहेत. राज्यात गोहत्याबंदी असताना मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. यासाठी चोरट्या मार्गाचा अवलंब केला जात आहे.