महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जंगलातील जुगारात 6 जुगारी सापडले; यवतमाळ पोलिसांची कारवाई - यवतमाळ पोलीस लेटेस्ट न्यूज

यवतमाळ ग्रामीणचे ठाणेदार गजानन करेवाड यांना पिंपरी जंगल शिवारात जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलिसांनी धाड टाकली असता, जुगारी मिळून आले. अंगझडतीत 17 हजार 340 रुपये व 4 लाख 55 हजारांच्या 11 दुचाकी जप्त केल्या.

Police raid on forest gambling in yavatmal
जंगलातील जुगारावर पोलिसांचा छापा; यवतमाळ पोलिसांची कारवाई

By

Published : Jan 10, 2021, 12:25 AM IST

यवतमाळ -ग्रामीण पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या पिंपरी जंगलातील जुगार अड्ड्यावर धाड टाकून सहा जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. यावेळी 11 दुचाकींसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सात जुगारी फरार झाले असून, त्यांचा शोध पोलीस घेत आहे. यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली.

जंगलातील जुगारावर पोलिसांचा छापा; यवतमाळ पोलिसांची कारवाई

11 दुचाकींसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

अंकुश कांबडी (23 रा. घुईखेड, जि. अमरावती), मंगेश सखाराम गावंडे (27), रजनिकांत दिलीप खाडे (3, दोघेही रा. बोथ, ता. दारव्हा), नौशाद शेख निजाम शेख (18, रा. हनुमाननगर, नेर), नितीन शंकर खडसे (26 रा. अण्णाभाऊ साठे चौक, नेर), मोहसिन खान, नजीर खान (27, रा. वाणीपूरा, नेर) अशी अटकेतील जुगारींची नावे आहे.

जंगलातील जुगारावर पोलिसांचा छापा; यवतमाळ पोलिसांची कारवाई

यवतमाळ ग्रामीणचे ठाणेदार गजानन करेवाड यांना पिंपरी जंगल शिवारात जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलिसांनी धाड टाकली असता, जुगारी मिळून आले. अंगझडतीत 17 हजार 340 रुपये व 4 लाख 55 हजारांच्या 11 दुचाकी जप्त केल्या. एकुण 13 जणांविरुद्घ जुगार कायद्या अंतर्गत ग्रामीण पोलिसांनी गुन्हे दाखल केले.

हेही वाचा - विशेष: ह्रदयद्रावक ठरलेल्या रुग्णालयातील आगीच्या काही दुर्घटना

ABOUT THE AUTHOR

...view details