यवतमाळ - सतपल्ली गावात दुपारी शेतात काम करीत असलेल्या महिलेला चाकूचा धाक दाखवून गळ्यातील मंगळसूत्र आणि कानातील डुल असा 20 हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेची तक्रार दाखल होताच पाटण पोलिसांनी अवघ्या एका तासात आरोपीला जेरबंद केले आहे.
महिलेवर चाकूचा हल्ला आणि लूट-
सतपल्ली गावामधील शोभा विजय सिन्नमवार ही आपल्या शेतात कापूस वेचत होत्या. त्यावेळी शेतात एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या जवळ आला आणि चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देत अंगावरील दागिन्यांची मागणी केली. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि कर्णफुले काढून घेत घटनास्थळावरून पळ काढला. लुटीचा हा प्रकार घडल्यानंतर शोभा यांचा मुलगा सुनिल याने पाटण पोलीस ठाण्यात चोरीच्या घटनेची फोनवरून माहिती दिली.
चाकूचा धाक दाखवून लूटले महिलेचे दागिने; चोरटा एक तासात गजाआड - यवतमाळ चोरीनंतर तासात जेरबंद
शेतात कापूस वेचणाऱ्या महिलेस चाकूचा धाक दाखवून दागिने लुटल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तासाभरातच चोरट्याचा मुसक्या आवळल्या आहेत.
चोरटा सराईत गुन्हेगार, अनेक गुन्हे दाखल
फोनवरून दाखल झालेल्या तक्रारीवर पोलिसांनी तत्काळ तपासाची सूत्रे हलवली आणि एका तासातच चोरट्याचा शोध घेऊन त्याला जेरबंद केले. दत्ता सुरेश लिंगनवार (30, रा. सदोबा सावळी)असे त्या चोरट्याचे नाव आहे. त्याच्या जवळून 20 हजारांचे चोरीतील मंगळसूत्र, कानातील डूल आणि गुन्ह्यात वापरलेली एक दुचाकी असा 50 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी दत्ता लिंगनवार याच्याविरूध्द मारेगाव, वणी, मुकुटबन पोलीस ठाण्यात घरफोडी, चोरी, लूटमार असे पाच ते सहा गुन्हे दाखल आहेत.