महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळमध्ये जनावरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी पकडला

ही कारवाई शहरातील आर्णी मार्गावर असलेल्या भांबराजा टोलनाका परिसरात मंगळवार (ता.२३) मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आली असून त्यातील २० जनावरांची सुटका करण्यात आली.

यवतमाळमध्ये जनावरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी पकडला
यवतमाळमध्ये जनावरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी पकडला

By

Published : Mar 24, 2021, 4:53 PM IST

यवतमाळ : जनावरांची अवैध वाहतूक करणारा एक ट्रक ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी रात्री पकडला. ही कारवाई शहरातील आर्णी मार्गावर असलेल्या भांबराजा टोलनाका परिसरात मंगळवार (ता.२३) मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आली असून त्यातील २० जनावरांची सुटका करण्यात आली.
टोल नाक्यावर केली कारवाई
शहरातील आर्णी मार्गावर असलेल्या जांबराजा टोलवर उभ्या असलेल्या ट्रकमध्ये (एमएच- ४० बीएल ६११२) जनावरे कोंबून नेले जात असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. तोपर्यंत तो ट्रक टोलवरील कर्मचाऱ्यांनी पकडून ठेवला होता. दरम्यान त्या ट्रकची पाहाणी करण्यात आली तर ट्रकमध्ये चक्क २० बैल कोंबून नेले जात असल्याचे आढळले. यावेळी पोलिसांनी ट्रक आणि २० बैल असा एकूण १३ लाखांचा मुद्देमाल जप्त करत जनावरांची सुटका केली. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात ट्रक चालक आणि मालकावर विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी माधुरी बाविस्कर, ठाणेदार सुरेश ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक सचिन पवार, एएसआय भगवान बावणे, संजय राठोड, चालक रूपेश नेवारे यांनी पार पाडली.

ABOUT THE AUTHOR

...view details