यवतमाळ- तेलंगाणातून कंटेनरमध्ये तीनशे नागरिकांना कंटेनरमध्ये कोंबून महाराष्ट्रात नेले जात असल्याने खळबळ उडाली. ही घटना नागपूर-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वर पांढरकवड्याजवळील पिंपळखुटी चेकपोस्ट येथे उघडकीस आली.
तेलंगाणातून महाराष्ट्रात जाणाऱ्या कंटेनरमध्ये जनावरांप्रमाणे कोंबून भरले ३०० नागरिक, पोलिसांनी . . . . . - कंटेनर
जनावराप्रमाणे 300 जणांना कंटेनरमध्ये कोंबून तेलंगाणातून महाराष्ट्रात आणले जात असल्याचा प्रकार उघडकीस आल्याने पोलिसही चक्रावून गेले. पूर्वी जनावर तस्करीसाठी या पद्धतीचा वापर केला जात होता.
महाराष्ट्र-तेलंगणा राज्याला जोडणारा नागपूर-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 हा पांढरकवडा तालुक्यातून जातो. राजाची सीमाबंदी केल्याने पिंपळखुटी चेकपोस्ट येथे पोलिसांनी वाहन तपासणी सुरू केली आहे. तेलंगाणावरुन निघालेला कंटेनर (एच.आर.73 ए-6983) पिंपळखुटी चेकपोस्टवर पोलिसांनी तपासणीसाठी थांबविला. संशय आल्याने चेकपोस्टवरच्या पोलिसांनी कंटेनरचे कुलूप उघडायला लावले. यात जवळपास 300 जण या कंटेनरमध्ये अक्षरश:कोंबलेल्या अवस्थेत आढळून आले. जनावराप्रमाणे ३०० जणांना कंटेनरमध्ये कोंबून तेलंगाणातून महाराष्ट्रात आणले जात असल्याचा प्रकार उघडकीस आल्याने पोलिसही चक्रावून गेले. पूर्वी जनावर तस्करीसाठी या पद्धतीचा वापर केला जात होता.
नागपूरवरुन जनावरे कत्तलीसाठी हैदराबादला अशाप्रकारे नेण्यात येत होती. हाच अनुभव गाठिशी असल्याने तेलंगाणा सीमाबंदी केल्यानंतर छुप्या पद्धतीने येथील व्यक्तींना महाराष्ट्रात आणले जाईल, हे गृहित धरून पोलिसांनी पडताळणी केली. त्यानंतर जवळपास 300 जण अवैधरित्या जीव धोक्यात घालून प्रवास करत असल्याचे उघड झाले. कंटेनेरमधून आलेल्या नागरिकांना चेकपोस्टवरुनच तेलंगाणात परत पाठविण्यात आले. या प्रकरणी पांढरकवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.