महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उमरखेड तालुक्यातील खरूस दरोडा प्रकरणी १० जणांना अटक; पोलिसांनी ४ दिवसात लावला छडा - kharus robbery case

उमरखेड तालुक्यातील खरूस शिवारात सालगड्याच्या घरावर 29 ऑगस्टला दरोडा टाकण्यात आला होता. याप्रकरणाचा पोलिसांनी 4 दिवसात उलगडा केला आहे. दरोडा प्रकरणी 10 जणांना अटक करण्यात आली आहे. 10 लाखांचा मुद्देमालदेखील पोलिसांनी जप्त केला आहे.

yavatmal police news
यवतमाळ पोलीस न्यूज

By

Published : Sep 3, 2020, 10:49 PM IST

यवतमाळ - शेतात राहणाऱ्या सालगड्यासह त्याच्या पत्नी व मुलाला शस्त्राने मारहाण करून 20 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटल्याची घटना 29 ऑगस्टला रात्रीच्या सुमारास उमरखेड तालुक्यातील खरूस शिवारात घडली होती. पोलिसांनी अवघ्या चार दिवसांत या घटनेचा उलगडा केला आहे. दरोडा प्रकरणी पोलिसांनी दहा जणांना गजाआड केले आहे.

खरुस दरोडा प्रकरणातील आरोपी ४ दिवसात गजाआड

विश्‍वनाथ शिंदे (22, रा. उमरी, जि. नांदेड), शुभम अडकीने (21, रा. भोकर), मनोज उर्फ चंद्रकांत मनोरवार (31, रा. भोकर, जि. नांदेड), विकास परिमल (39, रा. ढाणकी, जि. यवतमाळ), रामचंद्र संजेवाड (18, रा. भोकर), सूरज सावते (21, रा. पवना, ता. हिमायतनगर), चंद्रकांत सावते (28, रा. पवना), धम्मदीप राऊत (21, रा. पवना), अजय राऊत (20, रा. पवना), नितीन अडुलवार (20, रा. उमरी, ता. हिमायतनगर) अशी दरोडा टाकणार्‍यांची नावे आहेत.

हेही वाचा-सालगड्याला दरोडेखोरांची मारहाण; मदतीसाठी आलेल्या तरुणालाही फेकले विहिरीत

ढाणकी ते खरूस रोडवरील शेतकरी संजय जिल्हावार यांच्या शेतात सालगडी व त्याचा परिवार वास्तव्यास आहे. 29 ऑगस्टला सालगडी, पत्नी व मुलाला शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करत 20 हजार रुपये किमतीचे सोने लुटले गेले होते. दरोडेखोरांनी दुसर्‍या सालगड्याला विहिरीत फेकून दिले होते.

सालगडी नागोराव वामन डहाके यांनी बिटरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून गुन्हा नोंद करून तपास सुरू करण्यात आला. जिल्हावार यांच्या शेतात 3 पेटी सोने असल्याची माहिती ढाणकी येथील विकास परिमल याने चंद्रकांत सावते याला दिली. या माहितीवरुन साथीदारांची जुळवाजुळव करून जिल्हावार यांच्या शेतात दरोडा टाकण्यात आला. मात्र, हाती काहीच लागले नाही. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती.

पोलिसांनी घटनेचा छडा लावत दहा जणांना अटक केली. दरोड्यात वापरण्यात आलेले वाहन, तलवार, चाकू, मोबाईल असा एकूण दहा लाख 23 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर अधीक्षक नुरूल हसन, प्रभारी एसडीपीओ बागबान यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर, उपनिरीक्षक नीलेश शेळके, श्रीकांत जिंदमवार, संदीप चव्हाण, ठाणेदार विजय चव्हाण यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details