यवतमाळ - जामवाघाडी शिवारात सुरू असलेल्या जुगारावर यवतमाळ ग्रामीण पोलीस पोलिसांकडून धाड टाकण्यात आली. यामध्ये नऊ जुगारींना अटक करण्यात आली आहे. यावेळी घटनास्थळाहून नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई -
गुड्डू पहेलवान याचे शेत विनोद चव्हाण नामक व्यक्तीने मक्त्याने घेतले होते. त्या शेतात जुगार भरविला जात होता. ही गोपनीय माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी खासगी वाहनाने घटनास्थळ गाठून जुगारींना ताब्यात घेतले. घटनास्थळावरून नऊ जुगारींना अटक केली. दुचाकी, चारचाकी वाहनांसह आठ लाख 94 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगारींविरुद्ध यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
भूषण गनडीवार, सचिन लोहिया, चंदन मारोटे, सारंग वानरे (सर्व रा. चांदुररेल्वे जि. अमरावती) तर फईम कादर अन्सारी, (घाटंजी), प्रवीण उईके, (भांबराजा), विलास भगत (घाटंजी), नारायण राठोड (यवतमाळ) शेख असिफ शेख चांद, (घाटंजी) अशी अटकेती आरोपींची नावे आहेत.