यवतमाळ -आर्णी शहरात मागील 45 वर्षांपासून राजरोसपणे देहविक्रीचा व्यवसाय सुरू होता. देहविक्रीचा व्यवसाय सुरू असलेल्या प्रेम नगरातील 35 झोपड्यांचे अतिक्रमण पोलीस प्रशासन व नगरपालिका यांच्या संयुक्त मोहिमेत हटवण्यात आले आहे.
आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई
गेल्या कित्येक वर्षांपासून देहविक्रीसह विविध अवैध धंदे या झोपडपट्ट्यांमध्ये सुरू होते. मात्र मंगळवारी पहिल्यांदाच पोलिसांनी या झोपडपट्टीवर कारवाई केली. व प्रेमनगरला अतिक्रमणमुक्त केले. पोलीस आणि नगरपालिकेच्या या कारवाईचे नागरिकांमधून कौतुक होत आहे.
आर्णीत देहविक्रीच्या अड्ड्यावर पोलिसांची कारवाई परजिल्ह्यातून येत होत्या महिला
प्रेमनगरमध्ये असलेल्या या झोपडपट्टीमध्ये राजरोसपणे देहविक्रीचा व्यवसाय सुरू होता, यासाठी उमरेखेड, पुसद, दिग्रस, दारव्हा, यवतमाळमधून महिला आर्णीमध्ये येत होत्या. देहविक्रीसोबतच इतर अवैध धंदे देखील याठिकाणी सुरू होते. आता हे अतिक्रमण हटवल्याने या अवैध धंद्यांना आळा बसणार आहे.