यवतमाळ - शिंदेनगरात पोलिसांनी छापा टाकून अडीच लाखांचा गुटखा जप्त केला आहे. एका घरात हा गुटखा साठवून ठेवलेला होता. पोलिस नियंत्रण कक्षातील अधिकार्यांनी या कारवाईत दोघांना अटक केली. आलोक यादव, अजय यादव अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहे.
अडीच लाखांचा अवैध गुटखा जप्त; यवतमाळमध्ये पोलिसांची कारवाई - yavatmal illegal raid by police
शिंदेनगरात पोलिसांनी छापा टाकून अडीच लाखांचा गुटखा जप्त केला आहे. एका घरात हा गुटखा साठवून ठेवलेला होता. पोलिस नियंत्रण कक्षातील अधिकार्यांनी या कारवाईत दोघांना अटक केली.
गोपनीय माहितीच्या आधारे धाड
शिंदेनगरातील विदर्भ हाऊसिंग सोसायटीत राहणाऱ्या आलोक यादव आणि अजय यादव या दोघांनी जुन्या राहत्या घरी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित गुटखा, तंबाखू विक्रीसाठी साठविल्याची गोपनीय माहिती पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांना मिळाली होती. त्यावरून यादव याच्या घरी छापा टाकण्यात आला. यावेळी छाप्यात दोन लाख 60 हजार 395 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आलोक यादव, अजय यादव यांच्याविरुद्ध अवधूतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ, अपर पोलिस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक मनोज केदारे यांच्यासह पोलिस कर्मचार्यांनी केली.
हेही वाचा -'बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपींना जामीन मिळता कामा नये'