यवतमाळ- संचार बंदीच्या काळात पोलीस प्रशासनाकडून वारंवार नागरिकांना विनाकारण शहरात फिरू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, या आवाहनाला न जुमानता काही नागरिक विनाकारण शहरात फिरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे, आज पोलीस विभागाकडून वाहन जप्तीची मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत पोलिसांनी १२०० च्या वर दुचाक्या जप्त केल्या असून वाहन चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई कली आहे.
यवतमाळात संचारबंदी तोडणाऱ्यांवर कारवाई; पोलिसांनी १२०० दुचाकी केल्या जप्त - कोरोना यवतमाळ
वाहतूक शाखा व पोलीस विभागाने शहरातील दत्ता चौक, जाजू चौक, पाच कंदील चौक, मेन लाइन एरिया, गांधी चौक, कळम चौक, गोधनी रोड, दारव्हा रोड, आर्णी रोड तसेच इतर चौकात व भागात जाऊन दुचाकी चालकांविरुद्ध कारवाई केली आहे. पोलिसांनी १२०० दुचाकींबरोबरच ९ फोर व्हीलर देखील जप्त केल्या आहेत.
वाहतूक शाखा व पोलीस विभागाने शहरातील दत्ता चौक, जाजू चौक, पाच कंदील चौक, मेन लाइन एरिया, गांधी चौक, कळम चौक, गोधनी रोड, दारव्हा रोड, आर्णी रोड तसेच इतर चौकात व भागात जाऊन दुचाकी चालकांविरुद्ध कारवाई केली आहे. पोलिसांनी दुचाकींबरोबरच ९ फोर व्हीलर देखील जप्त केल्या आहेत. ही सर्व वाहने शहर पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात ठेवण्याता आली असून या प्रांगणाला दुचाकी शोरूमचे स्वरूप मिळाले आहे. या कारवाईपासून धडा घेत नागरिकांनी गरज असल्यावरच बाहेर निघावे आणि स्वत:ची काळजी घ्यावी, असे पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी आवाहन केले आहे.
ही वाचा-कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या एकाची प्रकृती चिंताजनक; आयसोलेशन वॉर्डातील 32 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह