यवतमाळ - पुसद पंचायत समितीमार्फत १४ व्या वित्त आयोगांतर्गत विहिरीच्या खोदकामाचा मोबदला न मिळाल्यामुळे एका ठेकेदाराने चक्क पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांच्या जागरुकतेमुळे हा प्रयत्न फसला.
पंचायत समितीच्या आवारात ठेकेदाराचा आत्मदहनाचा प्रयत्न - administrative
ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनेसाठी रामपूरनगर सावरगाव गोरे येथे एका विहिरीचे खोदकाम केले होते. मात्र त्या ठेकेदारास सहा महिने झाले तरीही त्या कामाचा मोबदला मिळाला नाही, त्यामुळे संतप्त झालेल्या ठेकेदाराने कार्यालयातच आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
नामदेव माणिकराव वागतकर (वय २९ रा. रुई गोस्ता ता. मनोरा, वाशिम) या युवकाने ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनेसाठी रामपूरनगर सावरगाव गोरे येथे एका विहिरीचे खोदकाम केले होते. या ठेकेदारास सहा महिने उलटूनही कामाचा मोबदला मिळाला नाही. वारंवार पुसद पंचायतीच्या चकरा मारून त्रस्त झालेल्या ठेकेदाराने कार्यालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
या ठेकेदाराने आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. मात्र कुंभकर्णी झोपेत असलेल्या प्रशासनाने याची दखल घेतली नाही. त्यामुळे स्वतःवर रॉकेल ओतून पेटवून घेण्याची वेळ ठेकेदारवर आली. पंचायत समिती प्रशासनाने या ठेकेदाराचे तातडीने बिल काढण्याचे आदेश दिले.