यवतमाळ - शासनाने प्लास्टिक बंदी केल्यामुळे आता कुठल्याही दुकानात प्लास्टिकची पिशवी दिसेनाशी झाली आहे. याच संधीचा फायदा घेत भिमालपेन या महिला बचत गटाच्या महिलांनी प्लास्टिकला पर्याय म्हणून कापडी आणि इतर पिशव्यांची निर्मिती केली आहे. हीच त्यांच्यासाठी उद्योगाची पायवाट ठरली आहे.
प्लास्टिक बंदी ठरली महिलांसाठी उद्योगाची पायवाट - service
भिमालपेन या महिला बचत गटाच्या महिलांनी प्लास्टिकला पर्याय म्हणून कापडी आणि इतर पिशव्यांची निर्मिती केली आहे. हीच त्यांच्यासाठी उद्योगाची पायवाट ठरली आहे.
आज जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळाव्यातील कार्यक्रमांमध्ये या बिमाल पेन महिला बचत गटांच्या महिलांनी स्टॉल लावला होता. नगरपालिकेच्या वतीने काही दिवसापूर्वी या महिला बचत गटांच्या महिलांना या पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. आज या महिला या पिशव्यांची निर्मिती करून विक्री करत आहेत. याचा त्यांना आर्थिक लाभ होत आहेत. या गटामध्ये असलेल्या महिला या कापडी पिशव्यांची निर्मिती करून विक्री करत आहेत. या पिशव्या सुबक आणि नाविन्यपूर्ण असल्याने ग्राहक या पिशव्यांची खरेदी करत आहेत.