यवतमाळगणपती उत्सव असो की अन्य धार्मिक सण ते पर्यावरण पूरक असावे. पीओपीच्या मुर्त्यामुळे प्रदूषण होत असल्याचे लक्षात आल्यापासून मातीच्या मूर्ती घडवून विक्रीचा निर्णय मूर्तिकार लखन सोनुलेने घेतला. स्पर्धेमुळे थोडा त्रास होतो आर्थिक नुकसान सोसावे लागते. मात्र आम्ही मातीच्या मुर्त्याच बनवतो आणि लोकांमध्ये पण जागृती करतो. अशी प्रतिक्रिया मूर्तिकार लखन सोनुले यांनी दिली
इको फ्रेंडली मूर्ती पाण्यामध्ये लवकर विरघळतातपाहता पाहता गणेशोत्सव उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. सगळीकडे नुसती लगबग सुरू झाली आहे. बाजारपेठ फुल बाजारने फुलायला लागली आहेत. पर्यावरण जपणारी मंडळे नव्या संकल्पना मांडण्यात दंग झाली आहे. अनेकांच्या घरांमध्ये उत्साह तर सिंगेला पोहोचला आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती नदीपात्रात विसर्जन करून पाणी दूषित करण्यापेक्षा शाडूची मूर्ती पूजन नंतर कृत्रिम तलावात विसर्जन करणे ही काळाची गरज आहे. पारंपारिक शाडूच्या मूर्ती ऐवजी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचा वापर तसेच सजावटीसाठी थर्माकोलचा वापर हा घातक आहे. रासायनिक रंगाचा वापर यामुळे जलप्रदूषण होऊन मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाची हानी होते. पाण्यात न विरघळणाऱ्या व भंगलेल्या गणेश मूर्ती बघून खऱ्या गणेश भक्तांचे मन सुन्न झाल्यापासून राहत नाही. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती मूळे होणारा पर्यावरणाचा हयास व गणेश मूर्तीची अवहेलना थांबवण्यासाठी प्रत्येकाने शाडू मातीच्या गणेश मूर्तीचा वापर करावा असे आवाहन निसर्गप्रेमींनी केले आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या तुलनेत मातीच्या बनवलेल्या मूर्ती पर्यावरणाला हानी पोहोचवत नाहीत. तसेच इको फ्रेंडली मूर्ती पाण्यामध्ये लवकर विरघळतात इको फ्रेंडली मूर्ती बनवण्यासाठी वापरणारे रंग हे कच्चे प्राकृतिक असतात. त्यामुळे पर्यावरणाला कोणतीही हानी पोहोचत नाही. त्यामुळेच प्रत्यकाने माती पासून तयार केलेला गणपती बसवावे असे आवाहन मूर्तिकार लखन सोनवणे यांनी केले आहे.
नैसर्गिक संसाधनांचा वापर करून मूर्ती तयारसरकारने पीओपी मूर्तींवर बंदी घातली POP idols banned आहे. अशा परिस्थितीत सुरुवाती पासूनच गणेशमूर्ती बनवताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी लखनने घेतली आहे. त्यामुळे घरगुती सार्वजनिक गणपतीमध्ये लाल माती, तनिस, गव्हाचा गवांडा आदी साहित्य वापरले जातात. नैसर्गिक संसाधनांचा वापर करून मूर्ती तयार केल्या जातात. जेणेकरून मूर्तीचे विसर्जन झाल्यावर ती निसर्गात लीन होईल.