यवतमाळ - मागील दोन्ही वर्षी सारखाच पाऊस झाला असताना या वर्षी टँकरची संख्या जास्त का? टंचाईग्रस्त भागात पाणी पुरवठा योजनेतून पाण्याचे नियोजन करा. तसेच, चालू असलेले टँकर कमी किंवा बंद करण्यासाठी प्रयत्न करा. पाणी उपलब्ध आहे, पण ते वेळेवर मिळत नाही, अशा तक्रारी येऊ देऊ नका. यवतमाळ पालिका क्षेत्रात नियमित पाणी पुरवठा झाला पाहिजे, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अधिकाऱ्यांना केल्या. ते पाणी टंचाई निवारणाबाबत आयोजित बैठकीत बोलत होते.
हेही वाचा -एक दिवसात 6474 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह 1032 जण पॉझिटिव्ह, 36 मृत्यू
तसेच, अमृत योजनेच्या कामाची डेडलाईन 1 जुलैपर्यंत ठरविण्यात आली आहे. तोपर्यंत अमृत योजनेचे काम चाचणीसह पूर्ण होणे आवश्यक आहे. यासाठी सतत पाठपुरावा करा. यवतमाळ शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी विद्युत विभागाच्या नेहमी संपर्कात राहा, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. बैठकीत महावितरण, नगरपालिका, जिल्हापरिषद, जलसंधारण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
टंचाई निवारणासाठी गांभिर्याने काम करा