यवतमाळ - संचारबंदीच्या काळात विनाकारण नागरिक रस्त्यावर फिरू नये, यासाठी पांढरकवडा तालुका प्रशासन आणि पोलिसांनी अनोखी शक्कल अमलात आणली आहे. कोणत्याही नागरिकाला आपल्या वाहनात पेट्रोल भरायचे असल्यास आधी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन नोंदणी करणे बंधनकारक आहे. आपले नाव, पत्ता आणि वाहनात पेट्रोल का भरायचे? ही सगळी माहिती पोलिसांना लिहून द्यायची आहे. पोलिसांना कारण पटले तरच पेट्रोल भरण्याच्या परवानगीची पावती मिळते.
पोलीस ठाण्यात नोंद केल्यानंतरच मिळणार पेट्रोल; पांढरकवडा प्रशासनाची अनोखी शक्कल
संचारबंदीच्या काळात विनाकारण नागरिक रस्त्यावर फिरू नये, यासाठी पांढरकवडा तालुका प्रशासन आणि पोलिसांनी अनोखी शक्कल अमलात आणली आहे. कोणत्याही नागरिकाला आपल्या वाहनात पेट्रोल भरायचे असल्यास आधी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन नोंदणी करणे बंधनकारक आहे.
पोलीस ठाण्यात नोंद केल्यानंतरच मिळणार पेट्रोल; पांढरकवडा प्रशासनाची अनोखी शक्कल
पोलीस स्टेशनमधून पावती मिळाल्यास ग्राहकाला पेट्रोल पंपावर जाऊन आपल्या वाहनात पेट्रोल भरता येणार आहे. या नव्या युक्तीमुळे पांढरकवडा शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची संख्याही रोडावली आहे. पांढरकवडा शहराची लोकसंख्या साधारण 30 हजार असून, तालुक्याच्या ठिकाणी नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन करावे यासाठी ह्या दृष्टीने तालुका प्रशासन आणि पोलीस प्रशासन एकत्र येऊन एक निर्णय घेतला आहे.
Last Updated : Apr 18, 2020, 8:41 PM IST