यवतमाळ - प्रतिबंधक क्षेत्रात सेवा बजावल्यानंतर गावात पोहोचलेल्या होमगार्डचे पुष्पवर्षाव करून स्वागत करण्यात आले. या स्वागतामुळे होमगार्डचे मन भरून आले होते. शाम अवस्थी असे त्या होमगार्डचे नाव आहे.
प्रतिबंधित क्षेत्रात बजावले कर्तव्य, होमगार्डचे पुष्पवर्षाव करुन गावकऱ्याकडून स्वागत - होमगार्ड
प्रतिबंधित असलेल्या इंदिरानगर, पवारपुरा या कोरोना पॉझिटिव्ह परिसरात आपल्या जीवाची पर्वा न करता सेवा देत होता. कुटुंबाची व लहान मुलांची काळजी न करता आपले कर्तव्य त्याने चोखपणे बजावले. अशा परिस्थितीत लढा देणाऱ्या तरुण कोरोना रक्षकाचा बोरीअरब येथील गावकऱ्यांनी पुष्पवर्षाव करुन स्वागत केले.
![प्रतिबंधित क्षेत्रात बजावले कर्तव्य, होमगार्डचे पुष्पवर्षाव करुन गावकऱ्याकडून स्वागत Home](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7204984-thumbnail-3x2-homegrd.jpg)
शाम अवस्थी हा तरुण गेल्या दीड महिन्यापासून यवतमाळ येथे प्रतिबंधित असलेल्या इंदिरानगर, पवारपुरा या कोरोना पॉझिटिव्ह परिसरात आपल्या जीवाची पर्वा न करता सेवा देत होता. कुटुंबाची व लहान मुलांची काळजी न करता आपले कर्तव्य त्याने चोखपणे बजावले. अशा परिस्थितीत लढा देणाऱ्या तरूण कोरोना रक्षकाचा बोरीअरब ग्रामपंचायत सदस्य ओम लढढा, बबलू जयस्वाल, विनोद कावळे तसेच राऊत कॉलनीमधील नागरिकांनी फुलाचा वर्षाव करून स्वागत केले. तसेच इतर मदत करण्यात आली. त्याला भावी आयुष्यासाठी मंगल शुभकामना देण्यात आल्या.
संकटसमयी बोरी ग्रामपंचायत खंबीरपणे पाठिशी उभी राहील, असे आश्वासन बबलू जयस्वाल यांनी दिले. कोरोना संकटात डॉक्टर, पोलीस, होमगार्ड, आरोग्य कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता राबत आहेत. आपणही आपले कर्तव्य जाणले पाहिजे, असा संदेश या स्वागतातून देण्यात आला.