यवतमाळ- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यवतमाळ येथील पत्रकार परिषद आटोपून दारव्हा येथे सभा घेण्यासाठी रवाना झाले. त्यावेळी काही जणांना पोलिसांनी स्थानबद्ध केले होते. त्यामुळे त्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातूनच मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले.
यवतमाळमध्ये मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे; कार्यकर्त्यांना केले स्थानबद्ध - काळे झेंडे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ येथील पत्रकार परिषद आटोपून दारव्हा येथे सभा घेण्यासाठी रवाना झाले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली.

दारव्हा येथे महाजनादेश यात्रा पोहचणार असल्याने पोलीस प्रशासनामार्फत कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले होते. मात्र, ही यात्रा दारव्हा शहरात पोहोचताच बस स्थानक चौकात राष्ट्रवादी व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवत निषेध केला.
या यात्रेच्या निमित्ताने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांकडून आंदोलन होण्याची शक्यता असल्याने त्यांना दारव्हा पोलीस ठाण्याचे आवारत स्थानबद्ध करून ठेवण्यात आले होते. दरम्यान, यांची महाजनादेश यात्रा ठाण्यासमोरून जात असताना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते यांनी आंदोलकांनी जोरदार घोषणा बाजी करत निषेध निषेध असे नारे लावले. यावेळी त्यांनी पोलीस ठाण्याच्या आवरातून काळे झेंडे दाखविले.